(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); महाकुंभ म्हणजे भव्यता-दिव्यता-पवित्रता यांचा त्रिवेणी संगम - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | मराठी १ नंबर बातम्या

महाकुंभ म्हणजे भव्यता-दिव्यता-पवित्रता यांचा त्रिवेणी संगम - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई ( ४ मार्च २०१९ ) : महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे महाकुंभमेळ्यात त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान केले. भव्यता, दिव्यता आणि सर्वात महत्वाचे म्हणजे पवित्रता या ठिकाणी अनुभवायला येत आहे, अशी भावना मुख्यमंत्री फडणवीस यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केली.

मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मांडलेली नवभारताची संकल्पना प्रत्यक्ष साकार करणारे हे आयोजन आहे. येथील गंगामाता व यमुनामाता यांचे रुप अतिशय मनोहारी आणि परिवर्तनाची साक्ष
देणारे आहे. यासाठी मी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे मनापासून अभिनंदन करतो. भाविकांमध्ये दिसणारा प्रचंड उत्साह आणि वंदे मातरमच्या घोषणांनी येथील वातावरण पूर्णपणे भारावून टाकले आहे. कोट्यवधी भारतीयांची आस्था या महाकुंभासोबत जोडली गेली आहे, त्यांनाही मी शुभेच्छा
देतो, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

स्वच्छतेमुळे व चोख व्यवस्थेमुळे हा महाकुंभ जगातील सर्वात मोठा आस्थेचा मेळावा म्हणून ओळखला जाईल, असेही ते म्हणाले. प्रयागराज येथे मुख्यमंत्र्यांसोबत केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे, राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल उपस्थित होते.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget