(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); महाराष्ट्रातील निवडणूक खर्च निरीक्षकपदी शैलेंद्र हांडा यांची नियुक्ती | मराठी १ नंबर बातम्या

महाराष्ट्रातील निवडणूक खर्च निरीक्षकपदी शैलेंद्र हांडा यांची नियुक्ती

नवी दिल्ली ( २० मार्च २०१९ ) : केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील आगामी लोकसभा निवडणुकीसाठी खर्च निरीक्षक म्हणून निवृत्त सनदी अधिकारी शैलेंद्र हांडा यांची नियुक्ती केली आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने मंगळवारी, महाराष्ट्र आणि तामीळनाडू राज्यातील लोकसभा निवडणूक काळात होणा-या निवडणूक खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी खर्च निरीक्षक म्हणून अनुक्रमे शैलेंद्र हांडा आणि मधू महाजन या निवृत्त सनदी अधिका-यांची नियुक्ती केली आहे.

हांडा यांना आयकर खात्याच्या तपास विभागात कार्य करण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे. निवडणूक यंत्रणेद्वारे केल्या जाणाऱ्या कामांवर हांडा लक्ष ठेवणार आहेत. तसेच निवडणूक प्रक्रियेला बाधा पोहचवत मतदारांना रोख रक्कम, दारू वाटणा-या व इतर प्रलोभण दाखविणा-या व्यक्ती/संस्था यांच्याविरुद्ध ‘सी-व्हीजील’द्वारे आणि ‘१९५० या मतदार हेल्पलाईनवर’ प्राप्त झालेल्या माहिती आणि तक्रारींच्या आधारे कठोर कारवाई करण्याचे अधिकार हांडा यांच्याकडे असतील.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget