मुंबई ( ३० मार्च २०१९ ) : सांगली लोकसभा मतदार संघात पृथ्वीराज (बाबा) सयाजीराव देशमुख यांनी जाहीर सभेत केलेल्या भाषणाच्या अनुषंगाने दाखल तक्रारीची शहानिशा करून त्यांच्याविरुद्ध भा.दं.वि.1860 चे कलम 171 आणि 171 ई नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.
सांगली लोकसभा मतदार संघांतर्गत मिरज विधानसभा मतदार संघात दि. 27 मार्च रोजी आणि पलूस-कडेगाव मतदार संघात 28 मार्च 2019 रोजी पृथ्वीराज देशमुख यांनी केलेल्या भाषणाच्या अनुषंगाने आयोगाकडे तक्रार केली गेली होती. तक्रारीची शहानिशा करून त्यांच्याविरुद्ध मिरज पोलीस ठाणे आणि भिलवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्याचेही कार्यालयाने कळविले आहे.

टिप्पणी पोस्ट करा