मुंबई ( २७ एप्रिल २०१९ ) : ऑस्ट्रेलिया व कॅनडा देशांच्या उच्चायुक्त कार्यालयाचे शिष्टमंडळ दि. 29 एप्रिल रोजी मुंबई दौऱ्यावर येत आहे. मतदान व निवडणूक प्रक्रिया जाणुन घेण्यासाठी हा दौरा असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने सांगितले.
जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारत देशातील निवडणूक प्रक्रियेचे संपूर्ण जगाला आकर्षण आहे. सध्या भारतात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका सुरू आहेत. मुंबईमधील निवडणूक प्रक्रियेची माहिती
घेण्यासाठी ऑस्ट्रेलिया व कॅनडाचे शिष्टमंडळ काही मतदान केंद्रांना भेटी देणार आहेत.
महाराष्ट्रात शेवटच्या टप्प्यातील मतदान दि. 29 एप्रिल 2019 रोजी होणार आहे. मतदान कालावधीत दोन्ही देशांची शिष्टमंडळे मुंबईमधील काही मतदान केंद्रांना भेटी देऊन प्रत्यक्ष मतदान व त्याच्या प्रक्रियेची पाहणी
करणार आहेत. मतदान कसे चालते?, मतदारांच्या रांगा, पोलीस बंदोबस्त, मतदान केंद्रातील कर्मचारी, ईव्हीएम व व्हीव्हीपॅट, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांसाठी करण्यात आलेल्या सुविधा आणि मतदान केंद्रावरील सुविधांची माहितीही शिष्टमंडळ जाणून घेणार आहे. याशिवाय सर्व महिला कर्मचारी असलेल्या ‘सखी मतदान केंद्राला’ ते भेट देऊन माहिती घेणार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा