(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); मावळ मतदारसंघात राज्यात सर्वांधिक 2,504 मतदान केंद्रे | मराठी १ नंबर बातम्या

मावळ मतदारसंघात राज्यात सर्वांधिक 2,504 मतदान केंद्रे

मुंबई ( ३ एप्रिल २०१९ ) : येत्या लोकसभा निवडणुकीसाठी मावळ मतदारसंघात एकूण 2 हजार 504 मतदान केंद्रे उभारण्यात येतील, ती राज्यात सर्वाधिक आहेत. मावळनंतर ठाणे, बारामती, रामटेक आणि बीड मध्ये सर्वाधिक मतदान केंद्रे असतील.

ठाणे मतदारसंघात 2,452, बारामती मतदारसंघात 2,372, रामटेक मतदारसंघात 2,364 आणि बीड मतदारसंघात 2,325 मतदान केंद्रे उभारण्यात येतील.

10 मतदारसंघात 2,100 हून अधिक मतदान केंद्रे

सातारा (2 हजार 296), शिरुर (2 हजार 296), यवतमाळ-वाशिम (2 हजार 206), चंद्रपूर (2 हजार 193), भंडारा (2 हजार 184), रायगड (2 हजार 179), परभणी (2 हजार 174), पालघर (अनुसुचित जमातीसाठी राखीव) (2 हजार 170), कोल्हापूर (2 हजार 148), उस्मानाबाद (2 हजार 127) या दहा मतदारसंघात 2,100 हून अधिक

मतदान केंद्रे असतील. सातारा आणि शिरुर मतदारसंघात सारखेच म्हणजेच 2 हजार 296 मतदान केंद्रे असणार असतील.

सर्वांत कमी मतदान केंद्रे मुंबई दक्षिण - मध्य मतदारसंघात

मुंबई दक्षिण-मध्य मतदारसंघात सर्वात कमी म्हणजे 1,572 मतदान केंद्रे असतील. मुंबई दक्षिण मतदारसंघात 1 हजार 578 मतदान केंद्रे, मुंबई उत्तर मतदारसंघात 1 हजार 715 मतदान केंद्रे असतील. उत्तर पूर्व आणि मुंबई उत्तर मध्य मतदारसंघात समान म्हणजे 1 हजार 721 मतदान केंद्रे असतील.

यंदाच्या लोकसभा निवडणुकांसाठी एकूण 97 हजार 640 मतदान केंद्रे असतील. यामध्ये ग्रामीण भागात 56 हजार 227 मतदान केंद्रे असतील. तर शहरी भागात 41 हजार 413 मतदान केंद्रे असतील.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget