(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); लोकसभा निवडणूक २०१९/विशेष वृत्त | मराठी १ नंबर बातम्या

लोकसभा निवडणूक २०१९/विशेष वृत्त

‘सायबर सुरक्षा’ मार्गदर्शिकेतून निवडणूक प्रक्रियेसाठी उपयुक्त टिप्स !

मुंबई ( ८ एप्रिल २०१९ ) : लोकसभा निवडणूकीत आयोगासह उमेदवार, आणि विविध राजकीय पक्ष सायबर जगताचा मोठ्या प्रमाणात वापर करीत आहेत. निवडणूक विषयक माहितीची सुरक्षितता, संरक्षित पासवर्ड, ईमेल्स, समाज माध्यम वापरताना घ्यावयाची काळजी, फेक न्यूजसह खोडसाळ प्रचार मोहीम राबविण्यासाठी ‘स्पिअर फिशिंग स्कॅम्स’ करणाऱ्यांपासून बचावासाठी कोणत्या दक्षता घ्याव्यात याच्या सूचना ‘महाराष्ट्र सायबर’ कार्यालयाने ‘सायबर सुरक्षा’ या पुस्तिकेद्वारे निवडणूक अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया अधिक सुटसुटीतपणे करण्यासाठी आयोगाकडून आधुनिक तंत्रज्ञानाचा, नव्या ॲप्सचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जात आहे. उमेदवारांसह राजकीय पक्षांनीही समाज माध्यमांचा वापर प्रचारासाठी सुरु केला आहे. समाज माध्यमांचा गैरवापर होऊ नये आणि निवडणूक प्रक्रिया तांत्रिकदृष्ट्या सुरक्षित रहावी यासाठी ‘महाराष्ट्र सायबर’ ने पुढाकार घेतला आहे. राज्यातील सर्व ४८ लोकसभा मतदार संघातील निवडणूक यंत्रणेला मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती आणि ऊर्दू या भाषेतून प्रकाशित केलेल्या ‘सायबर सुरक्षा’ मार्गदर्शिकेतून महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्याचे महाराष्ट्र सायबरचे विशेष पोलीस महानिरीक्षक ब्रिजेश सिंह यांनी सांगितले.

या पुस्तिकेत समाजमाध्यमांवरील बातम्या, ट्रोलिंग, प्रायोजित मजकूर याबाबतीत जनजागृती करण्याच्या सूचना, फेक ॲप्स आणि संकेतस्थळांबद्दल जागृती करण्याबरोबरच व्यक्तिगत आणि बाह्य उपकरणांच्या वापराविषयी दक्षता घेण्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले आहे.
सायबर सुरक्षामार्गदर्शिकेचे प्रकाशन
महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्पाच्यावतीने तयार करण्यात आलेल्यासायबर सुरक्षापुस्तिकेचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त मुख्य सचिव अश्वनी कुमार यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे, सह मुख्य निवडणूक अधिकारी अनिल वळवी, संचालक (माहिती) सुरेश वांदिले, महाराष्ट्र सायबरचे पोलीस अधिक्षक डॉ. बाळसिंग राजपूत आणि  सचिन पांडकर, उप मुख्य निवडणूक अधिकारी शिरीष मोहोड आदी उपस्थित होते.

समाज माध्यमांवरील फेक न्यूजची पडताळणी करण्यासाठी मोलाच्या टिप्स दिल्या आहेत. फेसबुकपोस्टच्या वर उजव्या बाजूच्या कोपऱ्यात ‘ही फेक न्यूज स्टोरी आहे’ हा पर्याय तर व्हॉटसअपवर अफवा अथवा माहिती खातरजमा करण्यासाठी ‘व्हॉटसअप चेकपॉईन्ट टीपलाईन’ वर पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. व्हॉटसअप वर निवडणुकीच्या संदर्भातील खोट्या बातम्या, अफवा, प्रक्षोभक मजकूर, चित्रांबद्दल सतर्क राहण्यासह त्याविषयी महत्त्वाच्या टिप्स देण्यात आल्या आहेत.

निवडणूक प्रक्रिया राबविताना कोणत्या गोष्टींमध्ये सावधगिरी बाळगली पाहिजे हे स्पष्ट करतानाच भारत सरकारने धोकादायक म्हणून घोषित केलेल्या ४२ ॲप्सची यादी प्रसिद्ध केली आहे. निवडणूक आयोगाच्या सी-व्हिजिलसह इतर अधिकृत ॲप्स, संकेतस्थळे तसेच तक्रारींसाठी महत्वाच्या नोडल्स संस्थांची माहिती या पुस्तिकेत देण्यात आली आहे. हॅक अथवा हायजॅक झालेल्या सोशल मीडिया खात्यांच्या बाबतीत महाराष्ट्र सायबरशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ही पुस्तिका राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या सहकार्याने ‘महाराष्ट्र सायबर’ कार्यालयाने तयार केली आहे.

किशोर गांगुर्डे, एप्रिल २०१९
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget