(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); जिल्हास्तर युवा पुरस्काराकरिता 20 एप्रिलपर्यंत प्रस्ताव पाठवा | मराठी १ नंबर बातम्या

जिल्हास्तर युवा पुरस्काराकरिता 20 एप्रिलपर्यंत प्रस्ताव पाठवा

मुंबई ( ११ एप्रिल २०१९ ) : क्रीडा व युवक सेवा संचालनालयामार्फत सन 2016-17 व सन 2017-18 या वर्षासाठी जिल्हा युवा पुरस्कार दिले जाणार आहेत. मुंबई उपनगर जिल्ह्यातील युवक, युवती आणि सामाजिक व युवकांसाठी कार्य करणाऱ्या संस्थांनी या पुरस्काराकरिता 20 एप्रिल 2019 पर्यंत प्रस्ताव पाठवावेत, असे आवाहन मुंबई उपनगर जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले आहे.

जिल्ह्यातील युवांनी व सामाजिक संस्थांनी केलेल्या समाजहिताच्या कार्याचा गौरव व्हावा व युवा विकासाचे कार्य करण्याकरिता त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी जिल्हा युवा पुरस्कार देण्यात येतो. सन 2016-17 व सन 2017-18 या दोन वर्षाकरिता 2 युवक, 2 युवती आणि 2 संस्था असे एकूण 6 पुरस्कार देण्यात येणार आहेत.

युवक/युवती पुरस्कार : पुरस्कार वर्षाच्या 1 एप्रिल रोजी पुरस्कारार्थींचे वय 13 वर्षे पूर्ण झाले पाहिजे. तसेच 31 मार्च रोजी वय 35 वर्षाच्या आत असले पाहिजे. अर्जदार मुंबई उपनगर जिल्ह्यात सलग 5 वषे वास्तव्यास असला पाहिजे. केलेल्या कार्याचे सबळ पुरावे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. वृत्तपत्र कात्रणे, प्रशस्तीपत्रे, चित्रफीत व फोटो जोडावेत. केंद्र, राज्य शासन, निमशासकीय कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी, विद्यापीठ अंतर्गत महाविद्यालय मधील प्राध्यापक/कर्मचारी पुरस्कारासाठी पात्र राहणार नाहीत.

संस्था युवा पुरस्कार : संस्थेची नोंदणी झाल्यानंतर 5 वर्षे कार्यरत पाहिजे. संस्था सार्वजनिक विश्वस्त अधिनियम 1860 किंवा मुंबई पब्ल‍िक ट्रस्ट ॲक्ट 1950 नुसार पंजीबद्ध असावी. गुणांकणाकरिता संस्थेने केलेल्या कार्याचे वृत्तपत्र कात्रणे, प्रशस्तीपत्रे, चित्रफीत व फोटो जोडावेत.

जिल्हास्तर युवा पुरस्काराकरिता इच्छुकांनी विहित नमुन्यातील अर्ज दिनांक 20 एप्रिल 2019 पर्यंत सुट्टीचे दिवस वगळून कार्यालयीन वेळेत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर, शासकीय शारीरिक शिक्षण महाविद्यालय खालील परिसर, संभाजीनगरसमोर, आकुर्ली रोड, कांदिवली (पूर्व) मुंबई-1 येथे सादर करावेत. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्र.022-28871105 यावर संपर्क साधावा. 
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget