(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); संगीतामुळे मानसिक आरोग्य सुदृढ - उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू | मराठी १ नंबर बातम्या

संगीतामुळे मानसिक आरोग्य सुदृढ - उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू

मुंबई ( २६ एप्रिल २०१९ ) : धावपळीच्या युगामध्ये मानसिक आरोग्याकडे लक्ष देणे शक्य होत नाही. त्यामुळे मानसिक आरोग्य समतोल राहत नाही. दररोज संगीत ऐकल्याने मानसिक आरोग्य सुदृढ होण्यास मदत मिळते, असे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी सांगितले.

एनसीपीए येथे साऊथ एशियन सिम्फनी ऑर्केस्ट्रा यांच्यावतीने संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

साऊथ एशियन सिम्फनी ऑर्केस्ट्रा मध्ये विविध देशाचे संगीत कलाकार असल्यामुळे या ऑर्केस्ट्राच्या माध्यमातून विश्वबंधुत्वाचा संदेश विश्वामध्ये गेला आहे. तसेच संगीताच्या माध्यमातून विविध देशातील मैत्रीचे संबंध दृढ होण्यास मदत मिळते, असेही उपराष्ट्रपती नायडू यांनी सांगितले.

यावेळी राज्यपाल चे. विद्यासागर राव, साऊथ एशियन सिम्फनी ऑर्केस्ट्राचे सुधाकर राव, निरुपमा राव तसेच विविध देशातील संगीत श्रोते उपस्थित होते.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget