(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); मतदानासाठी मतदार चिठ्ठीसोबत ओळखपत्र आवश्यक | मराठी १ नंबर बातम्या

मतदानासाठी मतदार चिठ्ठीसोबत ओळखपत्र आवश्यक

मुंबई ( २७ एप्रिल २०१९ ) : लोकसभा निवडणुकीसाठी सोमवारी दि. 29 एप्रिल 2019 रोजी शेवटच्या टप्प्याचे मतदान होणार आहे. मतदाराला निर्भय आणि मुक्त वातावरणात मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी निवडणूक यंत्रणेने जय्यत तयारी केली आहे. निवडणूक आयोगाचे ओळखपत्र (Epic) अथवा 11 प्रकारच्या ओळखपत्रांपैकी एक ओळखपत्र दाखवून मतदान करता येईल. मतदारांच्या सोयीसाठी देण्यात आलेली मतदार चिठ्ठी ही मतदाराचे नाव, मतदान केंद्र याच्या माहितीसाठी आहे. केवळ ही मतदार चिठ्ठी मतदानासाठी पुरेशी नाही. मतदार यादीत नाव असणे आवश्यक आहे. निवडणूक आयोगाचे ओळखपत्र अथवा 11 प्रकारच्या ओळखपत्रांपैकी एक ओळखपत्र आवश्यक असल्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी सांगितले.

ऑनलाईन मतदार पावतीमुळे मतदान केंद्र, मतदार यादीतील क्रमांक आणि यादी भाग क्रमांक आदीबाबत माहिती मिळणे शक्य होणार आहे. nvsp.in या निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर किंवा ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर मतदान केंद्र, क्रमांक, स्थळ इत्यादी तपशील पाहता येईल. प्रत्यक्ष
मतदानाच्या वेळी निवडणूक आयोगाचे ओळखपत्र किंवा अन्य अकरा प्रकारच्या ओळखपत्रांपैकी कोणतेही एक ओळखपत्र आवश्यक आहे, असेही शिंदे यांनी सांगितले.

मतदानासाठी आवश्यक 11 ओळखपत्रे

मतदानासाठी भारत निवडणूक आयोगाचे ओळखपत्र नसेल आणि मतदार यादीत नाव असेल तर अशावेळी अन्य अकरा प्रकारे आयोगाने ग्राह्य केलेल्या ओळखपत्रांच्या माध्यमातून मतदारास आपला हक्क बजावता येईल. यामध्ये पासपोर्ट (पारपत्र), वाहन चालक परवाना, छायाचित्र असलेले कर्मचारी ओळखपत्र (राज्य/केंद्र
शासन, सार्वजनिक उपक्रम, सार्वजनिक मर्यादित कंपन्यांचे ओळखपत्र), छायाचित्र असलेले बँकांचे पासबूक, पॅनकार्ड, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर) अंतर्गत महसूल निर्मिती निर्देशांक
(रेव्हेन्यू जनरेशन इंडेक्स) द्वारे दिलेले स्मार्टकार्ड, मनरेगा जॉबकार्ड, कामगार मंत्रालयाने दिलेले आरोग्य विमा स्मार्टकार्ड, छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन दस्तावेज, खासदार/आमदार/विधानपरिषद सदस्य
यांनी दिलेले ओळखपत्र आणि आधारकार्ड यांचा समावेश आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget