(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); 56 वा राज्य मराठी चित्रपट महोत्सव | मराठी १ नंबर बातम्या

56 वा राज्य मराठी चित्रपट महोत्सव

प्राथमिक फेरीची नामांकने तसेच तांत्रिक पुरस्कार घोषित

मुंबई ( १२ एप्रिल २०१९ ) : 56 व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सवातील प्राथमिक फेरीच्या तीन नामांकनांची शिफारस तसेच 7 तांत्रिक पुरस्कार व बालकलाकाराचे एक अशी आठ पारितोषिके घोषित करण्यात आली आहेत.

अंतिम फेरीसाठी दिठी, भोंगा, आणि डॉ. काशिनाथ घाणेकर, फायरब्रँड, बंदीशाळा, आम्ही दोघी, एक सांगायचय, अनसेड हार्मोनी, तेंडल्या, भूर्जी, चुंबक या दहा चित्रपटांचे उत्कृष्ट चित्रपटाच्या पारितोषिकांसाठी नामांकन झाले आहे. तर घोषित पारितोषिकांमध्ये उत्कृष्ट कला दिग्दर्शनासाठी नरेंद्र हळदणकर (बंदीशाळा), उत्कृष्ट छायालेखनासाठी सुधीर पळसाने (आणि डॉ. काशिनाथ घाणेकर), उत्कृष्ट संकलनासाठी नचिकेत वाईकर (तेंडल्या), उत्कृष्ट ध्वनीमुद्रणासाठी गंधार मोकाशी (आणि डॉ. काशिनाथ घाणेकर), उत्कृष्ट ध्वनी संयोजनासाठी मंदार कमलापूरकर (पुष्पक विमान), उत्कृष्ट वेशभूषासाठी चैत्राली गुप्ते (एक सांगायचय अनसेड हार्मोनी), उत्कृष्ट रंगभूषासाठी विक्रम गायकवाड (आणि डॉ. काशिनाथ घाणेकर), उत्कृष्ट बालकलाकारासाठी श्रीनिवास पोकळे (नाळ)आणि अमन कांबळे (तेंडल्या) यांना पारितोषिके घोषित करण्यात आली आहेत.

दि. 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2018 या कॅलेंडर वर्षात सेन्सॉर संमत झालेल्या मराठी चित्रपटांपैकी एकूण 66 मराठी चित्रपटांच्या प्रवेशिका 56 व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सवाच्या प्राथमिक फेरीत दाखल झाल्या होत्या. त्या सर्व चित्रपटांचे प्राथमिक फेरीच्या 14 तज्ज्ञ परीक्षक मंडळाकडून परीक्षण करण्यात आले.

घोषित पुरस्कारांव्यतिरिक्त नामांकन लाभलेल्या पुरस्कारासाठी अंतिम फेरीच्या तज्ज्ञ परीक्षक मंडळाकडून संबंधित चित्रपटांचे परीक्षण केले जाणार असून हे पुरस्कार 26 मे 2019 रोजी चित्रपटसृष्टीतील मान्यवरांच्या उपस्थितीत समारंभपूर्वक प्रदान करण्यात येतील.
अंतिम घोषित पारितोषिके; तांत्रिक विभाग व बालकलाकार

अ.क्र.
विभाग
पारितोषिक प्राप्त नाव
चित्रपट
1
उत्कृष्ट कला दिग्दर्शन
कै.साहेबमामा ऊर्फ फत्तेलाल पारितोषिक रु.50 हजार /- व मानचिन्ह
नरेंद्र हळदणकर
बंदीशाळा
2
उत्कृष्ट छायालेखन
कै. पांडूरंग नाईक पारितोषिक
रु. 50 हजार /- व मानचिन्ह
सुधीर पळसाने
आणि डॉ. काशिनाथ घाणेकर
3
उत्कृष्ट संकलन
रु. 50 हजार /- व मानचिन्ह
नचिकेत वाईकर
तेंडल्या
4
उत्कृष्ट ध्वनीमुद्रण
रु. 50 हजार /- व मानचिन्ह
गंधार मोकाशी
आणि डॉ. काशिनाथ घाणेकर
5
उत्कृष्ट ध्वनी संयोजन
रु. 50 हजार /- व मानचिन्ह
मंदार कमलापूरकर
पुष्पक विमान
6
उत्कृष्ट वेशभूषा
रु. 50 हजार /- व मानचिन्ह
चैत्राली गुप्ते
एक सांगायचय
अनसेड हार्मोनी
7
उत्कृष्ट रंगभूषा
रु. 50 हजार /- व मानचिन्ह
विक्रम गायकवाड
आणि डॉ. काशिनाथ घाणेकर
8
उत्कृष्ट बालकलाकार
कै. गजानन जहागिरदार पुरस्कार आणि
रु. 50 हजार /- व मानचिन्ह
1) श्रीनिवास पोकळे
2) अमन कांबळे
1) नाळ
2) तेंडल्या

नामनिर्देशन

अ.क्र.
विभाग
नामनिर्देशन
चित्रपट
1.
सर्वोत्कृष्ट कथा
कै.मधुसूदन कालेलकर
पारितोषिक रु.50 हजार /- व मानचिन्ह
1.शिवाजी लोटन पाटील
भोंगा
2. सुधाकर रेडडी यवंटी
नाळ
3. अरुणा राजे
फायरब्रँड
2.
उत्कृष्ट पटकथा
पारितोषिक रु.50 हजार /- व मानचिन्ह
1.सुमित्रा भावे
दिठी
2.शिवाजी लोटन पाटील
निशांत धापसे
भोंगा
3.अभिजीत शिरीष देशपांडे
आणि डॉ. काशिनाथ घाणेकर
3.
उत्कृष्ट संवाद
कै.आचार्य अत्रे पारितोषिक
रु.50 हजार /- व मानचिन्ह
1.विवेक बेळे
आपला माणूस
2.अभिजित शिरीष देशपांडे
गुरु ठाकूर
आणि डॉ. काशिनाथ घाणेकर
3.अरुणा राजे
फायरब्रँड
4.
उत्कृष्ट गीते
कै.माडगुळकर पारितोषिक
रु.50 हजार /- व मानचिन्ह
1.संजय कृष्णाजी पाटील
गीत-काळोखाच्या वाटेवर उजेड रुसला बाई
बंदीशाळा
2.सुनील सुखटणकर
गीत-राधे राधे
वेलकम होम
3.सायली खरे
गीत- दिस येती दिस जाती
न्यूड
5.
उत्कृष्ट संगीत
कै.अरुण पौडवाल पारितोषिक
रु.50 हजार /- व मानचिन्ह
1.राजेश सरकाटे
मेनका उर्वशी
2.शैलेंद्र बर्वे
एक सांगायचय
अनसेड हार्मोनी
3.नरेंद्र भिडे
संतोष मुळेकर
पुष्पक विमान
6.
उत्कृष्ट पार्श्वसंगीत
रु.50 हजार /- व मानचिन्ह
1.संतोष मुळेकर
आणि डॉ. काशिनाथ घाणेकर
2.विजय नारायण गवंडे
बंदीशाळा
3.पियूष कनोजिया
सविता दामोदर परांजपे
7.
उत्कृष्ट पार्श्वगायक
रु.50 हजार /- व मानचिन्ह
1.आदर्श शिंदे
गीत - या जगी नसेन मी
सोपस्कार
2. रुषीकेश रानडे
गीत- तुझया आठवणीचे
व्हॉटस अप लग्न
3.स्वप्निल बांदोडकर
गीत-मला सॉरी म्हणायचंय
माधुरी
8.
उत्कृष्ट पार्श्वगायिका
रु.50 हजार /- व मानचिन्ह
1.निहीरा जोशी देशपांडे
गीत-फुंकरीची वादळे
व्हॉटस अप लग्न
2.प्रियंका बर्वे
गीत-दीशा पेटल्या दाही
बंदीशाळा
3.वैशाली सामंत
गीत-तुम्ही येताना केला इशारा
फर्जंद
9.
उत्कृष्ट नृत्य दिग्दर्शक
रु.50 हजार /- व मानचिन्ह
1.दिपाली विचारे
पुष्पक विमान
2.उमेश जाधव
मेनका उर्वशी
3.फलवा खामकर    
व्हॉटस अप लग्न
10.
उत्कृष्ट  अभिनेता
कै.शाहू मोडक पारितोषिक
रु.50 हजार /- व मानचिन्ह
श्री शिवाजी गणेशन पुरस्कार
1.के.के.मेमन
एक सांगायचय
अनसेड हार्मोनी
2.किशोर कदम
दिठी
3.सुबोध भावे
आणि डॉ. काशिनाथ घाणेकर
11.
उत्कष्ट अभिनेत्री
कै.स्मिता पाटील पारितोषिक रु.50 हजार /- व मानचिन्ह
1.मुक्ता बर्वे
बंदीशाळा
2.देविका दप्तरदार
नाळ
3.कल्याणी मुळे
न्यूड
12.
उत्कृष्ट विनोदी अभिनेत्री
कै.रत्नमाला पारितोषिक
रु.50 हजार /- व मानचिन्ह
1.शिफारस नाही
शिफारस नाही
2. शिफारस नाही
शिफारस नाही
3. शिफारस नाही
शिफारस नाही
13.
उत्कृष्ट विनोदी अभिनेता
कै.दामूअण्णा मालवणकर पारितोषिक रु.50 हजार /- व मानचिन्ह
1.                शिफारस नाही
शिफारस नाही
2.‍शिफारस नाही
शिफारस नाही
2.               शिफारस नाही
शिफारस नाही
14.
सहाय्यक अभिनेता
कै.चिंतामणराव कोल्हटकर पारितोषिक रु.50 हजार /- व मानचिन्ह
1.                सुमित राघवन
आपला माणूस
2.               स्वानंद किरकिरे
चुंबक
3.               सचिन खेडेकर
फायरब्रँड
15.
सहाय्यक अभिनेत्री
कै.शांता हुबळीकर व कै.हंसा वाडकर पारितोषिक रु.50 हजार /- व मानचिन्ह
1.                राजेश्वरी सचदेव
फायरब्रँड
2.               नंदीता धुरी
आणि डॉ.काशिनाथ घाणेकर
3.               छाया कदम
न्यूड
16
उत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेता
कै. काशिनाथ घाणेकर पारितोषिक
रु.50 हजार /- व मानचिन्ह
1.                आशिष गिरमे
भूर्जी
2.               फिरोज शेख
तेंडल्या
3.               संतोष राममीना मिजगर
पाटील
17
उत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेत्री
कै.रंजना देशमुख पारितोषिक रु.50 हजार /- व मानचिन्ह
1.                प्रिती रणखंबे
भूर्जी
2.               गौरी कोथावडे
पुष्पक विमान
3.               गुरबानी गील
होडी

निकालपत्र

अंतिम फेरीकरीता प्रथम पदार्पण चित्रपट निर्मिती व प्रथम पदार्पण दिग्दर्शन
अंतिम फेरीकरीता प्रथम पदार्पण चित्रपट निर्मिती

अ.क्र.
चित्रपटाचे नाव
चित्रपट संस्थेचे नाव
1.                
बंदीशाळा
शांताई मोशन पिक्चर्स
स्वाती संजय पाटील
2.                
एक सांगायचय
अनसेड हार्मोनी
देवी सातेरी प्रॉडक्शन
प्रभाकर परब
3.                
तेंडल्या
सचिन जगन्नाथ जाधव
प्रथम पदार्पण दिग्दर्शन
अ.क्र.
चित्रपटाचे नाव
दिग्दर्शकाचे नाव
1.
एक सांगायचय
अनसेड हार्मेानी
लोकेश विजय गुप्ते
2.
चुंबक
संदीप मोदी
3.
तेंडल्या
सचिन जाधव
नचिकेत वाईकर

अंतिम फेरीकरीता उत्कृष्ट चित्रपट
अ.क्र.
चित्रपटाचे नाव
1
दिठी
2
भोंगा
3
आणि डॉ. काशिनाथ घाणेकर
4
फायरब्रँड
5
बंदीशाळा
6
आम्ही दोघी
7
एक सांगायचय अनसेड हार्मोनी
8
तेंडल्या
9
भूर्जी
10
चुंबक

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget