नवी दिल्ली ( ६ एप्रिल २०१९ ) : येथील कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनात मराठी नव वर्ष ‘गुढी पाडवा’ साजरा करण्यात आला. निवासी आयुक्त समीर सहाय यांच्या हस्ते गुढी उभारुन उपस्थित अधिकारी, कर्मचारी व मराठी जणांना नव वर्षारंभाच्या शुभेच्छा दिल्या.
महाराष्ट्र सदनाच्या हिरवळीवर उभारण्यात आलेल्या गुढीची सहाय यांनी पूजा केली. यावेळी उपस्थित निवासी आयुक्त सुमन चंद्रा, विजय कायरकर, अजितसिंह नेगी आदींनी गुढीचे पूजन केले. महाराष्ट्र सदन तसेच महाराष्ट्र परिचय केंद्राचे अधिकारी -कर्मचारी यावेळी उपस्थित होते. महाराष्ट्र सदनात निवासी असणारे पाहुणे तसेच यावेळी उपस्थित दिल्लीत विविध क्षेत्रात कार्यरत मराठीजणांनी गुढीचे पुजन केले.

टिप्पणी पोस्ट करा