(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); मॅराथॉनच्या माध्यमातून एकतेचा संदेश जागतिक स्तरावर - राज्यपाल | मराठी १ नंबर बातम्या

मॅराथॉनच्या माध्यमातून एकतेचा संदेश जागतिक स्तरावर - राज्यपाल

मुंबई ( ३० एप्रिल २०१९ ) : मॅराथॉन स्पर्धेमध्ये देश-विदेशातील धावपट्टू सहभागी होतात. यामुळे एकतेचा संदेश जागतिक स्तरावर पोहचतो, असे राज्यपाल चे.विद्यासागर राव यांनी आज येथे सांगितले.

टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेसने टाटा मुंबई मॅराथॉन 2019 साठी निधी उभारणाऱ्या संस्थांचा ऑपेरा हाऊस येथे पुरस्कार सोहळा आयोजित केला होता. त्यावेळी राज्यपाल बोलत होते.

टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेसने मॅराथॉनच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना एकत्रित करण्याचा प्रयत्न केला असून यामुळे एकतेच्या भावनेला प्रेरणा मिळते, असेही राज्यपालांनी यावेळी सांगितले.

यावेळी राज्यपालांच्या हस्ते निधी उभारणाऱ्या विविध संस्थाचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. मुख्य सचिव यु.पी.एस.मदान, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव संजय कुमार, टाटा कन्सलटन्सीचे ब्रँड कस्टोडियन हरीश भट्ट, अमृता फडणवीस, अभिनेत्री तारा शर्मा तसेच विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget