(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); बारावीचा आज निकाल | मराठी १ नंबर बातम्या

बारावीचा आज निकाल

चार अधिकृत संकेतस्थळावर

मुंबई (२७ मे २०१९ ) : फेब्रुवारी- मार्च 2019 मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळामार्फत घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल 28 मे रोजी जाहीर होणार आहे. पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या 9 विभागीय मंडळाअंतर्गत बारावी परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे.

www.mahresult.nic.in,www.hscresult.mkcl.org, www.maharashtraeducation.com, आणि www.maharashtra12.jagranjosh.com या संकेतस्थळावर मिळेल. सर्व विद्यार्थ्यांना विषयनिहाय संपादित केलेले गुण सदर संकेतस्थळावर दिसतील तसेच याची प्रिंटआऊटही घेता येईल. याशिवाय बारावीचा निकाल एसएमएस सेवेद्वारेही मोबाईल फोनवरुन मोबाईल ऑपरेटरद्वारे उपलब्ध होतील. MHHSC<space> <seat no> असा एसएमएस 57766 या क्रमांकावर पाठविल्यास विद्यार्थ्यांना कळू शकेल.

www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालाशिवाय निकालाबाबतची इतर सांख्यिकीय माहिती मिळेल. तर www.mahahsscboard.maharashtra.gov.in आणि www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल मिळेल. ऑनलाईन निकालानंतर विद्यार्थ्यांना लगेचच दुसऱ्या दिवसापासून गुणपडताळणी व छायाप्रतीसाठी अर्ज करण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आली असून, यासाठी आवश्यक असणाऱ्या अर्जाचा नमुना मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आला आहे. बारावीची पुरवणी परीक्षा मागील वर्षाप्रमाणेच जुलै- ऑगस्ट 2019 मध्ये घेण्यात येणार असल्याचे मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी कळविले आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget