(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); चार अनधिकृत शाळांमध्ये प्रवेश न घेण्याचे शिक्षण निरिक्षकांचे आवाहन | मराठी १ नंबर बातम्या

चार अनधिकृत शाळांमध्ये प्रवेश न घेण्याचे शिक्षण निरिक्षकांचे आवाहन

मुंबई ( २८ मे २०१९ ) : बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील कलम 18 नुसार कोणतीही शाळा संबंधित शासन अथवा स्थानिक प्राधिकरणाच्या मान्यता/ना-हरकत प्रमाणपत्राशिवाय सुरु करता येत नाही. मात्र शिक्षण निरीक्षक कार्यालयाच्या अधिपत्याखाली येणाऱ्या 4 शाळा अनधिकृतपणे सुरु आहेत. या 4 शाळांमध्ये कोणत्याही विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊ नये, असे आवाहन शिक्षण निरीक्षक राजेंद्र अहिरे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

अनधिकृतपणे सुरु असलेल्या शाळा

1. मदर तेरेसा स्कूल, ब्लॉक नंबर 12, राजीव गांधी नगर, ट्राँझीट कँम्प, 90 फुटरोड, धारावी, मुंबई- 17

2. एन.आय.ई.एस. इंग्लिश सेकंडरी स्कूल, धारावी ट्राँझीट कँम्प, न्यू स्कुल कम्पाऊंड, धारावी, मुंबई- 17

3. छबिलदास प्राथमिक शाळा, (सी.बी.एस.ई.बोर्ड), दादर(पश्चिम), मुंबई- 28

4. मदनी हायस्कूल, 1 ला मजला, साबू सिद्दीकी मुसाफिरखाना, क्रॉफर्ड मार्केट, मुंबई
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget