(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 59 व्या वर्धापन दिनानिमित्त विधानभवन येथे ध्वजारोहण | मराठी १ नंबर बातम्या

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 59 व्या वर्धापन दिनानिमित्त विधानभवन येथे ध्वजारोहण

मुंबई ( १ मे २०१९ ) : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 59 व्या वर्धापन दिनानिमित्त विधान भवन, मुंबई येथे महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या शुभहस्ते आणि महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी 09.30 वाजता ध्वजारोहण संपन्न झाले.

यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांचे सनई-चौघडा व तुतारीच्या निनादात पारंपारिक मराठमोळया पध्दतीने स्वागत करण्यात आले.

महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी झालेल्या जनआंदोलनातील सर्व नेत्यांच्या त्यागाचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करून या जनआंदोलनात हौतात्म्य पत्करावे लागलेल्या सर्वांच्या पवित्र स्मृतीस सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी अभिवादन केले.

महाराष्ट्र हे देशपातळीवर एक अग्रगण्य राज्य असून हा लौकिक यापुढेही कायम राहण्यासाठी सर्वांनी कार्यतत्पर राहावे असे असे सांगून सभापती रामराजे नाईक- निंबाळकर यांनी आपल्या संदेशात सध्याच्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पाण्याचा अपव्यय टाळण्याचे, उपलब्ध जलसाठ्याचे योग्य पद्धतीने नियोजन करून जलसाक्षरता ही संकल्पना सर्वांनी यशस्वीपणे राबविण्याचे आवाहन केले. त्यांनी यावेळी राज्यातील जनतेला महाराष्ट्र दिनाच्या तसेच कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

ध्वजारोहण सोहळ्यास महाराष्ट्र विधानपरिषदेच्या सदस्या डॉ.(श्रीमती) निलम गोऱ्हे तसेच महाराष्ट्र विधिमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे, सह सचिव विलास आठवले, उप सचिव राजेश तारवी, नागनाथ थिटे, मा.सभापतींचे सचिव महेंद्र काज, मा.अध्यक्षांचे सचिव राजकुमार सागर यांच्यासह विधानमंडळाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विधिमंडळाचे मुख्य सुरक्षा अधिकारी प्रवीण पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने यावेळी मानवंदना दिली.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget