(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); मोबाईल ॲपद्वारे पशूधनाच्या होणार नोंदी | मराठी १ नंबर बातम्या

मोबाईल ॲपद्वारे पशूधनाच्या होणार नोंदी

राज्यातील 1284 छावण्यांमध्ये साडेआठ लाख पशूधन

मुंबई ( ७ मे २०१९ ) : राज्यातील अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, लातूर, औरंगाबाद, सातारा, सोलापूर, सांगली, जालना, परभणी, हिंगोली आणि पुणे या जिल्ह्यांमध्ये 1284 राहत शिबिरे आणि छावण्या उघडण्यात आल्या आहेत. यामध्ये लहान मोठे मिळून 8 लाख 55 हजार 513 पशूधन दाखल झाले आहेत. पुणे, सातारा, सांगली आणि औरंगाबाद या चार जिल्ह्यांमध्ये स्वयंसेवी संस्थांनी स्वच्छेने व स्वखर्चाने सहा छावण्या सुरु केल्या आहेत. या चारा छावण्यांमध्ये पशूधनाच्या दैनंदिन उपस्थितीची नोंद करण्यासाठी अँड्रॉईड प्रणालीवरील ॲप विकसित करण्यात आले असून त्याचा वापर करण्याचे निर्देश छावण्यांना देण्यात आले आहेत.

राज्यातील छावण्यांमधील पशुधनाच्या आहारामध्येही वाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. चारा छावण्यांमध्ये दाखल मोठ्या जनावरांना यापूर्वी 15 किलोग्रॅम हिरवा चारा, उसाचे वाडे, ऊस दिला जात होता. आता मोठ्या जनावरांना दैनंदिन 18 किलो हिरवा चारा, उसाचे वाडे किंवा ऊस दिला जाईल. त्याचबरोबर लहान जनावरांना यापूर्वी 7.5 किलो हिरवा चारा, उसाचे वाडे किंवा ऊस दिला जात होता. आता त्यात वाढ करुन 9 किलो दैनंदिन चारा दिला जाईल.

सध्या राज्यातील या छावण्यांमध्ये 8 लाख 55 हजार 513 जनावरे दाखल आहेत. या सर्व छावण्यांमधील दाखल जनावरांपैकी मोठ्या जनावरांसाठी प्रतिदिन 90 रुपये, तर लहान जनावरांसाठी प्रतिदिन 45 रुपये या प्रमाणे अनुदान मंजूर करण्यात आले आहे.

राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत 35 कोटी निधी उपलब्ध झाला असून चाऱ्यासाठी 25 हजार 99 क्विंटल बियाणांचे वितरण झाले आहे. गाळ पेरा क्षेत्रात 17 हजार 465.64 हेक्टर तर शेतकऱ्यांच्या शेतात 41 हजार 355.68 हेक्टर अशी एकूण 58 हजार 821.32 हेक्टर क्षेत्रावर चाऱ्याची पेरणी झाली आहे. यामधून 29.4 लक्ष मेट्रिक टन हिरवी वैरण उत्पादन अपेक्षित आहे.

मदत व पुनर्वसन निधीमधून महसूल व वन विभागाकडून 10 कोटी निधी राहत व चारा शिबिरांकरिता प्राप्त झाला आहे. यामधून उस्मानाबादमधील भगवंत बहुउद्देशीय संस्था, हाडोंग्री, ता. भूम या संस्थेला 238.91 लक्ष, श्री. येडेश्वर गोकुलम गोशाळा दुधाळवाडी, येरमाळा, ता. कळंब या संस्थेला 61.09 लक्ष तर बीड जिल्ह्यातील यशवंत बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, पालवण, ता. बीड या संस्थेला 185.78 लक्ष निधी वितरित केला आहे.

छावण्यातील जनावरांना बारकोड

दुष्काळी भागात शासनाच्यावतीने सुरु करण्यात आलेल्या चारा छावण्यांमधील पशुधनाच्या दैनंदिन उपस्थितीची नोंद करण्यासाठी संगणकीय प्रणालीचा वापर करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत. यासाठी छावणीमधील जनावरांना बारकोड असलेले टॅग लावण्यात येणार आहेत.

चारा छावण्यांमधील पशूधनाच्या दैनंदिन उपस्थितीच्या नोंदीसाठी कॅटल कॅम्प मॅनेजमेंट सिस्टिम (Cattle Camp Management System) हे प्रणाली विकसित करण्यात आली असून ती छावणी चालकांना व्यवस्थापनासाठी विनाशुल्क उपलब्ध करून देण्यात आली आहे. या ॲपमध्ये छावणी चालकाला प्रथम छावणीतील पशूधनाची माहिती भरावी लागणार आहे. त्यानंतर बारकोड असलेले टॅग जनावरांच्या कानात लावावे लागणार आहे. छावणीतील जनावरांची दिवसातून एकदा संख्या मोजावी लागणार असून त्यासाठी बारकोड स्कॅन करावे लागणार आहे. या नोंदीनुसारच चारा छावणी चालकांना अनुदान शासनाच्या वतीने दिले जाईल. बारकोड लावणे, ॲपमध्ये जनावरांची व छावणीची माहिती अपलोड करणे यासंबंधीचे प्रशिक्षण छावणी चालकांना देण्यात येणार आहे.

या प्रणालीच्या वापरामुळे राज्यातील विविध जिल्ह्यात सुरु असलेल्या चारा छावण्यांमधील पशुधनाची दैनंदिन संख्या जिल्हाधिकारी, तहसिलदार यांना http://www.charachavani.com/ या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे.
महसूल विभागाच्या मान्यतेने उघडण्यात आलेल्या पशूधन छावण्या
अ.क्र.
जिल्हा
छावण्यांची संख्या
जनावरांची संख्या
लहान
मोठे
एकूण
1.       
अहमदनगर
472
40464
255407
295871
2.      
बीड
598
31089
375481
406570
3.      
उस्मानाबाद
79
5928
50038
55966
4.     
लातूर
1
79
773
852
5.     
औरंगाबाद
4
1831
1577
3408
6.      
सातारा
19
1553
9804
11357
7.     
सोलापूर
92
26239
20522
46761
8.     
सांगली
2
140
627
767
9.      
जालना
3
366
1610
1976

एकूण
1270
107689
615839
823528
राहत व चारा शिबीरात दाखल पशूधन
अ.क्र.
जिल्हा
राहत शिबिरांची संख्या
पशूधन संख्या
लहान
मोठे
एकूण
1.
औरंगाबाद
1
5
429
434
2.
जालना
1
50
119
169
3.
परभणी
1
1254
153
1407
4.
बीड
1
465
4086
4551
5.
उस्मानाबाद
2
1127
13264
14391
6.
अहमदनगर
1
118
449
567
7.
हिंगोली
1
11
25
36

एकूण
8
3030
18525
21555
स्वयंसेवी संस्थांनी स्वखर्चाने उघडलेल्या छावण्या
अ.क्र.
जिल्हा
छावण्यांची संख्या
पशूधन संख्या
लहान
मोठे
एकूण
1.
पुणे
3
113
806
919
2.
सातारा
1
1061
7336
8997
3.
सांगली
1
36
44
80
4.
औरंगाबाद
1
5
429
434

एकूण
6
1215
8615
10430Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget