मुंबई ( १३ मे २०१९ ) : राज्यातील विविध सहा जिल्ह्यांमधील सरपंचांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ऑडिओ ब्रीज सिस्टीमद्वारे संवाद साधून गावागावांतील पाणी टंचाईची परिस्थिती जाणून घेतली. पुणे, सातारा, सांगली, चंद्रपूर, अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यातील साधारण 150 हून अधिक सरपंचांशी बोलून मुख्यमंत्री फडणवीस यांनी दुष्काळी परिस्थिती, पाणी टंचाई, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न, रोजगाराचा प्रश्न आदी विविध विषयांवर सरपंचांकडून माहिती घेत त्यावर कार्यवाही करण्याच्या जिल्हा प्रशासनाला सूचना दिल्या.
आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी सकाळी 11.30 पासून सलग झालेल्या बैठकांमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांनी सरपंचांशी मोबाईलवरुन थेट संवाद साधून त्यांच्याशी दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांसंदर्भात चर्चा केली. या संवादात जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांचाही सहभाग होता. मुख्यमंत्री म्हणाले, दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने टंचाईसंदर्भातील कोणत्याही प्रस्तावावर विनाविलंब ४८ तासाच्या आत निर्णय घ्यावा. प्रशासन आणि लोकांच्या एकत्रित सहभागातून या परिस्थितीवर निश्चित मात केली जाईल. त्यासाठी सर्वांनी एकदिलाने काम करावे. तहसीलदारांनी गावातील २०१८ ची लोकसंख्या आणि जनावरांची संख्या विचारात घेऊन त्याप्रमाणे टँकरद्वारे पाणी पुरवठा होईल याची दक्षता घ्यावी, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
सरपंचांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार
दुष्काळाच्या प्रश्नावर थेट सरपंचांशी मोबाईलवर चर्चा करुन समस्या जाणून घेतल्याबद्दल आजच्या संवादादरम्यान अनेक सरपंचांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. दुष्काळ निवारणासाठी सरपंच आणि जिल्हा प्रशासनासह राज्य शासनाचा संवाद घडवून आणणारा हा उपक्रम राबविल्याबद्दल बारामती तालुक्यातील सरपंच निलेश केदारी यांनी बारामती सरपंच संघटनेच्या वतीने मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.
कोरड्या पात्रातील गाळ शेतजमिनींसाठी वापरा
सध्या दुष्काळी परिस्थितीमुळे अनेक बंधारे, तलाव तसेच प्रकल्पातील पाणी खोल गेले आहे. अशा परिस्थितीत कोरड्या पात्रातील गाळ हा 'गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार' योजनेअंतर्गत काढून तो शेतजमिनींसाठी वापरावा. पाऊस सुरु होण्यापूर्वी शक्यतो मे महिन्यातच याबाबतीत गतीने कार्यवाही करण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज पुणे, सातारा आणि सांगली जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांना दिले.
नदी असलेल्या गावांमध्येही पाण्याचे टँकर सुरू करावेत
सातारा जिल्ह्यातील दुष्काळ निवारणासाठी तात्पुरत्या व तातडीच्या उपाय योजना राबविण्यावर प्रशासनाने भर द्यावा. गावातून नदी गेली आहे परंतु, त्याला पाणी नसेल अशा ठिकाणीही मागणीनुसार पाण्याचे टँकर सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रशासनास दिले. कायम दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजनांचे प्रस्ताव पाठविण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.
जनावरांची संख्या लक्षात घेऊन चारा छावण्या सुरु कराव्यात
सांगली जिल्ह्यात एकूण 10 तालुक्यांपैकी 5 तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील दुष्काळ निवारणासाठी तात्पुरत्या व तातडीच्या उपाय योजना राबविण्यावर प्रशासनाने भर द्यावा. सध्या सांगलीत एकूण 4 चारा छावण्या सुरु असल्या तरी जनावरांची संख्या लक्षात घेऊन वाढीव चारा छावण्या सुरु कराव्यात, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी सांगली जिल्ह्यातील सरपंचांशी संवाद साधताना दिले.
योजनांची दुरुस्ती करून पाणीपुरवठा सुरळीत करा
नादुरुस्त असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या योजनांची तत्काळ दुरुस्ती करावी. तसेच ज्या पाणीपुरवठा योजना थकित वीज देयकामुळे बंद आहेत अशा योजनांची वीज देयके भरून जिल्हा प्रशासनाने या योजना पुन्हा सुरु करुनपाणी पुरवठा सुरळित करावा असे आदेश दिले.
पिण्यासाठी पाणी आणि हाताला काम
ग्रामस्थांना पिण्यासाठी पाणी, हाताला काम आणि जनावरांना चारा-छावणी मिळेल, असे नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज यवतमाळ जिल्हा प्रशासनाला दिले.
पाणी टंचाई निवारणासाठी प्रयत्न करावेत
अमरावती जिल्ह्यात ज्या भागात पाणीटंचाई आहे तेथे भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या माध्यमातून पाणी पुरवठा करण्याबाबत जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि तहसीलदार यांनी तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले.
बैठकीस मुख्य सचिव अजोय मेहता, पाणीपुरवठा विभागाचे अपर मुख्य सचिव श्यामलाल गोयल, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, पदूम विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार, जलसंधारण आणि रोहयो विभागाचे सचिव एकनाथ डवले, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव ब्रिजेश सिंह, मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा