(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); नवी मुंबईसह 9 महानगरपालिकांतील रिक्तपदांसाठी 23 जून रोजी मतदान | मराठी १ नंबर बातम्या

नवी मुंबईसह 9 महानगरपालिकांतील रिक्तपदांसाठी 23 जून रोजी मतदान

मुंबई ( २४ मे २०१९ ) : उल्हासनगर, नवी मुंबई, कल्याण- डोंबिवली, पुणे, कोल्हापूर, नाशिक, मालेगाव, परभणी व चंद्रपूर या नऊ महानगरपालिकांमधील 15 रिक्तपदांच्या पोटनिवडणुकीसाठी 23 जूनला मतदान; तर 24 जून 2019 रोजी मतमोजणी होणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली.

सहारिया यांनी सांगितले की, नामनिर्देशनपत्रे 30 मे 2019 ते 6 जून 2019 या कालावधीत दाखल करता येतील. 2 व 5 जून 2019 रोजी शासकीय सुट्टीमुळे नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार नाहीत. 7 जून 2019 रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत 10 जून 2019 पर्यंत असेल. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना 11 जून 2019 रोजी निवडणूक चिन्हे नेमून देण्यात येतील. 23 मे 2019 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. मतमोजणी 24 जून 2019 रोजी सकाळी 10 वाजता सुरू होईल. पोटनिवडणुका होणारे महानगरपालिकानिहाय प्रभाग: उल्हासनगर- 1ब आणि 5अ, नवी मुंबई- 29, कल्याण-डोंबिवली- 26, पुणे- 42अ, 42ब (हद्दवाढ क्षेत्रासाठी), आणि 1अ, कोल्हापूर- 28 आणि 55, नाशिक- 10ड, मालेगाव- 6क, परभणी- 11अ आणि 3ड व चंद्रपूर- 6ब आणि 13ब.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget