मुंबई ( २८ मे २०१९ ) : पुणे जिल्ह्यातील बारामती नगर परिषदेअंतर्गत विकास योजनेत नगर रचना योजना क्रमांक 1 मधील भूखंड क्रमांक 271 वरील क्रीडांगणाचे आरक्षण बदलण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली असून आर्थिक दुर्बल घटकांची घरे बांधण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
बारामती नगर परिषद हद्दीत असणाऱ्या या जागेवर 12 एप्रिल 2012 मधील विकास योजनेत क्रीडांगणासाठी आरक्षण घोषित करण्यात आले होते. या भूखंडाचे आरक्षण बदलण्यात आले असून या भूखंडावर आता आर्थिक दुर्बल घटकांसाठी वसाहत आकारास येणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा