(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); चित्रपट निर्मिती क्षेत्रात औपचारिक शिक्षणाबरोबरच निरीक्षण महत्त्वाचे - जॉन बेली | मराठी १ नंबर बातम्या

चित्रपट निर्मिती क्षेत्रात औपचारिक शिक्षणाबरोबरच निरीक्षण महत्त्वाचे - जॉन बेली

मुंबई ( २६ मे २०१९ ) : चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात औपचारिक शिक्षणाबरोबरच निरीक्षण महत्त्वाचे आहे असे मत अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्टस अँड सायन्सेसचे (ऑस्कर अकादमी) अध्यक्ष जॉन बेली यांनी आज येथे नोंदविले.

येथील फिल्म डिव्हिजनच्या सभागृहात ऑस्कर अकादमीचे अध्यक्ष जॉन बेली आणि त्यांच्या पत्नी तथा ऑस्कर अकादमीच्या गव्हर्नर कॅरल लिटलटन यांच्या मुलाखतीचे आयोजन करण्यात आले. चित्रपट दिग्दर्शक मधुर भांडारकर आणि लोकप्रिय चित्रपट अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी बेली दाम्पत्याची मुलाखत घेतली. सिनेमॅटोग्राफी, फोटोग्राफी आणि चित्रपट संकलन या विद्याशाखांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या पुढाकाराने या मुलाखतीचे आयोजन करण्यात आले.

जॉन बेली म्हणाले, मी आणि माझी पत्नी आम्ही दोघेही फ्रेंच सिनेमाचे चाहते आहोत. आमच्या आवडत्या फ्रेंच दिग्दर्शकांपैकी कुणीही चित्रपट निर्मितीचे औपचारिक प्रशिक्षण घेतले नव्हते. तरीही त्यांच्या कलाकृती उत्तम कलाकृती म्हणून गणल्या जातात. मी स्वत: चित्रपट निर्मितीचे औपचारिक प्रशिक्षण घेतले आहे, परंतु त्यादरम्यान मी फक्त तासनतास बसून चित्रपट पाहायला शिकलो. निरीक्षण करायला शिकलो. जिज्ञासूंनी क्रायटेरियन कलेक्शन( Criterion Collection) पाहावे असेही ते म्हणाले.

निरीक्षण ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे तुम्हाला एखादी गोष्ट का करावी, किंवा का करु नये हे समजते असे कॅरल लिटलटन यांनी सांगितले.

भारताला चित्रपटनिर्मितीची समृद्ध परंपरा आहे. सत्यजित रे यांच्यासारखे दिग्दर्शक या भूमीत होऊन गेले. भारताकडे उत्तमोत्तम चित्रपट निर्मितीची प्रचंड क्षमता आहे. मात्र अजूनही भारताला जागतिक सिनेमामध्ये म्हणावे असे स्थान प्राप्त झाले नाही. भारताने त्यांच्या चित्रपटातून आपण कोण आहोत हे जगाला दाखवून द्यावे असे आवाहन जॉन बेली यांनी केले.

यावेळी जॉन बेली आणि कॅरल लिटलटन यांनी चित्रपट निर्मितीचे तंत्र, बदलते तंत्रज्ञान, जागतिक चित्रपटांमध्ये महिलांचे स्थान, सिनेमॅटोग्राफी, संकलन, दिग्दर्शन, ॲमेझॉन आणि नेटफ्लिक्समुळे चित्रपट व्यवसायाची बदलती गणितं आदी विविध विषयांवर मनमोकळेपणाने संवाद साधला.

कार्यक्रमासाठी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे, सिनेमॅटोग्राफी, फोटोग्राफी आणि चित्रपट संकलन या विद्याशाखांचा अभ्यास करणारे विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी बेली दाम्पत्याने विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरेही दिली.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget