(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); विधानपरिषद पोटनिवडणूक : 7 जूनला मतदान | मराठी १ नंबर बातम्या

विधानपरिषद पोटनिवडणूक : 7 जूनला मतदान

माध्यम प्रतिनिधींनी प्राधिकारपत्रासाठी 27 मे पर्यंत अर्ज करावेत

मुंबई ( २० मे २०१९ ) : महाराष्ट्र विधानपरिषदेचे विद्यमान सदस्य शिवाजीराव बापुसाहेब देशमुख यांचे 14 जानेवारी 2019 रोजी निधन झाल्यामुळे रिक्त झालेल्या एका जागेसाठी 7 जून रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीच्या मतदान व मतमोजणीचे वृत्तसंकलन आणि छायाचित्रण करण्याकरिता प्रसिद्धी माध्यम प्रतिनिधींनी प्राधिकारपत्रांसाठी 27 मे पर्यंत माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई येथे अर्ज सादर करावेत, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

भारत निवडणूक आयोगाने विधानपरिषद पोट निवडणूक – 2019 च्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला आहे. त्यानुसार निवडणुकीचे मतदान शुक्रवार 7 जून रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत होणार आहे. तसेच मतमोजणी त्याच दिवशी सायंकाळी 5 वाजता होणार आहे. ह्या निवडणुकीच्या मतदान/मतमोजणीचे वृत्तसंकलन/छायाचित्रण करण्याकरिता प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींना भारत निवडणूक आयोगाचे विविध प्राधिकारपत्रे प्राप्त करणे आवश्यक आहे. प्रसिद्धी माध्यमांच्या ज्या प्रतिनिधींना द्विवार्षिक निवडणुकीकरिता प्राधिकारपत्रे हवी असतील अशा प्रतिनिधींनी आपले नावे, आपल्या पासपोर्ट आकाराच्या छायाचित्राच्या 2 प्रतीसह (मतदान/मतमोजणी दोन्ही प्राधिकारपत्रे हवी असल्यास 3 प्रतींसह) माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई यांच्याकडे 27 मे पर्यंत पाठवावीत. छायाचित्राशिवाय प्राप्त झालेली मागणी तसेच 27 मे नंतर या कार्यालयात प्राप्त झालेली मागणी स्वीकारण्यात येणार नाही, असेही या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget