मुंबई ( २१ मे २०१९ ) : आमदार हनुमंतराव डोळस यांच्या निधनामुळे सकारात्मक व्यक्तीमत्त्वाचे उमदे नेतृत्व हरपले, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे माळशिररसचे दिवंगत आमदार हनुमंतराव डोळस यांना श्रद्धांजली वाहिली. डोळस परिवाराच्यावतीने आयोजित शोकसभेत ते बोलत होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आमदार डोळस उमद्या व्यक्तीमत्वाचे होते. त्यांची विधिमंडळातही सर्वपक्षीय अशी मैत्री होती. अनेक प्रश्नांचा विशेषतः गरिबांसाठीच्या जमिनीच्या प्रश्नांचा त्यांनी सातत्यपूर्ण
पाठपुरावा केला. अडचणीच्या परिस्थितीतून येऊनही ते स्वत:च्या मेहनतीने उभे राहिले. शिक्षणाच्या सोयी आणि साहित्य गरजू घटकांपर्यंत पोहचविण्यासाठी त्यांनी स्वत:च्या ट्रस्टच्या माध्यमातूनही भरीव कार्य
केले.'
गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, आमदार आशिष शेलार यांनीही दिवंगत डोळस यांना श्रद्धांजली वाहिली. शोकसभेस डोळस कुटुंबियांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा