(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); परतूर मंठा तालुका क्रीडा संकुलाच्या कामाला गती देणार - बबनराव लोणीकर | मराठी १ नंबर बातम्या

परतूर मंठा तालुका क्रीडा संकुलाच्या कामाला गती देणार - बबनराव लोणीकर

मुंबई ( २९ मे २०१९ ) : जालना जिल्ह्यातील परतूर-मंठा तालुका क्रीडा संकुलाच्या कामाला लागणारा आवश्यक तो सर्व निधी लवकरच देण्यात येईल. अत्याधुनिक सोयी-सुविधायुक्त असे तालुका क्रीडा संकुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे मंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिले.

परतूर तालुका क्रीडा संकुलाच्या बांधकामासाठी एक कोटी रुपये इतका निधी मंजूर असून हा निधी शासनाकडून प्राप्त झालेला आहे. या क्रीडा संकुल उभारणीस अतिरिक्त निधीसाठी शासनास वाढीव रुपये 15 कोटींचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. या क्रीडा संकूलामध्ये स्विमिंगपूल, 200 मिटर धावनपथ, बॅडमिंटन हॉल, क्रीडांगण सपाटीकरण, प्रशासकीय इमारत, विद्युतीकरण, खो-खो, कबड्डी आणि व्हॉलीबॉल साठी प्रत्येकी 2 मैदाने, संरक्षण भिंत, अंतर्गत रस्ते आणि क्रीडा साहित्य इत्यादींचा समावेश आहे.

मंठा तालुका क्रीडा संकुलाच्या बांधकामासाठी एक कोटी रुपये इतका निधी मंजूर असून हा निधी शासनाकडून प्राप्त झालेला आहे. या क्रीडा संकुल उभारणीस अतिरिक्त निधीसाठी शासनास वाढीव रुपये 15 कोटींचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. या क्रीडा संकूलामध्ये 200 मिटर धावनपथ, बॅडमिंटन हॉल,विविध खेळाची मैदाने, संरक्षण भिंत इतक्या सुविधा विकसीत करण्यात येत आहेत. तालुका क्रीडा संकुल मंठा येथील कामे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत पूर्ण करण्यात येणार आहेत. यासाठी

वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे निधी मिळविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला व त्यामुळेच हा निधी शासनाकडून मिळाला यामुळे आज हे क्रीडा संकुल सुसज्य व सर्व सुविधायुक्त उभे राहणार आहे.

तसेच विभागीय क्रीडा संकुल अमरावती, नागपूर, शिवछत्रपती क्रीडापीठ बालेवाडी पुणे व तालुका क्रीडा संकुल चंद्रपूर प्रमाणे परतूर-मंठा तालुका क्रीडा संकुलाची उभारणी करण्याचे निर्देशही यावेळी लोणीकर यांनी दिले.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget