(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); मनोरा आमदार निवास पुनर्बांधणीबाबत उच्चाधिकार समितीची बैठक संपन्न | मराठी १ नंबर बातम्या

मनोरा आमदार निवास पुनर्बांधणीबाबत उच्चाधिकार समितीची बैठक संपन्न

मुंबई ( २८ मे २०१९ ) : येथील मनोरा आमदार निवास पुनर्बांधणीसंदर्भात उच्चाधिकार समितीची बैठक आज विधानभवनात संपन्न होऊन सुरु असलेल्या कामाबाबतचा आढावा घेण्यात आला.

यावेळी विधानपरिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर, विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते.

मनोरा आमदार निवास इमारतीचे बांधकाम करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या परवानग्या एमएमआरडीएकडून प्राप्त करुन घेणे, मनोरा आमदार निवासाच्या बाजूला असणारा आर. जी. भूखंड सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नावे करणे तसेच पुनर्बांधणी कामास 1.33 इतका एफएसआय घेणे, सीआरझेड संदर्भातील केंद्र सरकारच्या नवीन नोटिफिकेशननुसार नव्याने आराखडा सादर करण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्व परवानग्या तातडीने प्राप्त करुन मनोरा निवास पुनर्बांधणी कामास प्रारंभ करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. या बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी, एमएमआरडीए, नगरविकास, मुंबई महानगरपालिका, महसूल विभाग, जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिकारी तसेच पर्यावरण आणि नॅशनल बिल्डींग कन्स्ट्रक्शन कार्पोरेशन, नवी दिल्लीचे अधिकारी उपस्थित होते.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget