(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); राज्यात मान्सूनचे आगमन होण्यास विलंब | मराठी १ नंबर बातम्या

राज्यात मान्सूनचे आगमन होण्यास विलंब

शेतकऱ्यांनी हवामानाच्या अंदाजानुसार नियोजन करावे


मुंबई ( २६ मे २०१९ ) : राज्यात यंदा मान्सूनच्या आगमनाला उशीर होणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. मान्सूनचे आगमन अंदमान भागात झाले असले तरी त्याची पुढची वाटचाल हळू राहणार आहे. यामुळे केरळमध्ये जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत तरी मान्सूनच्या आगमनाची शक्यता कमी आहे.

राज्यात किमान 8 जूनपर्यंत तरी मान्सून-पूर्वीच्या पावसाची शक्यता नाही. 31 मे पर्यंत तापमानात बदल अपेक्षित नसल्यामुळे उन्हाचा चटका कायम राहील, परंतु 1 जूनपासून पूर्व-विदर्भ वगळता इतर भागातील कमाल तापमान कमी होण्यास सुरुवात होईल. यंदा मान्सूनच्या आगमनाला उशीर होणार असला तरी शेतकऱ्यांनी काळजी करू नये. त्यांनी शेतीच्या मशागतीची कामे पूर्ण करावी आणि हवामानाच्या सल्ल्यानुसार पुढचे नियोजन करावे, असे आवाहन कृषि विभागाकडून करण्यात आले आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget