(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); मतमोजणी केंद्रावर अचूकता व पारदर्शीपणा आवश्यक - जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे | मराठी १ नंबर बातम्या

मतमोजणी केंद्रावर अचूकता व पारदर्शीपणा आवश्यक - जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे

मुंबई ( १५ मे २०१९ ) : मतमोजणी केंद्रातील कर्मचाऱ्यांनी आपल्या कामामध्ये अधिक अचूकता व पारदर्शीपणा ठेऊन आपले मतमोजणीचे कर्तव्य पूर्ण करावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी जोंधळे यांनी केले.
मुंबई शहर जिल्हा 30-मुंबई दक्षिण मध्य व 31-मुंबई दक्षिण या दोन लोकसभा मतदार संघाची मतमोजणी दि. 23 मे 2019 रोजी शिवडी येथील मुंबई पोर्ट ट्रस्टच्या गोडाऊनमध्ये होत आहे. या मतमोजणीसाठी 900 कर्मचाऱ्यांची मतमोजणी केंद्रावर नियुक्ती करण्यात आलेली असुन या कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण परळ येथील दामोदर हॉलमध्ये काल दि.14.05.2019 रोजी पार पडले, त्यावेळी संबंधित कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी शहाजी पवार, बन्सी गवळी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी फरोग मुकादम, उपजिल्हाधिकारी कृष्णमुर्ती तसेच सहायक निवडणूक निर्णय अधिकारी पद्माकर रोकडे, ज्ञानेश्वर खुटवाड, रविंद्र हजारे, अंजली भोसले, बी. जी. गावंडे, स्वाती कार्ले, सुष्मा सातपुते, बाळा वाघचौरे, दादासाहेब दातकर, किरण पाणबुडे, विश्वास गुजर, प्रशांत सुर्यवंशी तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी जोंधळे मार्गदर्शन करताना पूढे म्हणाले की, मतमोजणीचे काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांनी आपल्या कामामध्ये शक्यतो कुठलीही चूक होऊ न होता अचूकतेने काम करावे. त्यासोबतच उपस्थित पक्ष प्रतिनिधींसोबत मोजकाच संवाद साधावा. लोकशाहीच्या एका अत्यंत महत्वाच्या उत्सवात तुम्ही सहभागी झाला असुन त्याचे गांभीर्य आपण सर्वांनी बाळगणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. त्यासोबतच जर कोणी आजारी असेल तर त्यानी आपल्या आजारपणाची अगोदरच पूर्व कल्पना द्यावी. जेणेकरुन पर्यायी व्यवस्था करणे शक्य होऊ शकेल. तसेच आपल्यावर सोपविण्यात आलेली जबाबदारी विहीत व निर्धारित वेळेत पूर्ण करुन देण्यात आलेल्या सर्व सूचनांचे पालन करावे, असेही ते म्हणाले.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget