(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अभिवादन | मराठी १ नंबर बातम्या

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अभिवादन

मुंबई ( ३१ मे २०१९ ) : पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी पदुम मंत्री महादेव जानकर, आमदार राधाकृष्ण विखे पाटील, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी नंदकुमार, सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव संजय भोसले, कक्ष अधिकारी ललित सदाफुले यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
००००

मंत्रालयात अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन

प्रजाहितदक्ष, सुधारणावादी, कुशल प्रशासक राज्यकर्त्या अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांच्या हस्ते मंत्रालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार व फुले अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव संजय भोसले, सामान्य प्रशासन विभाग राज्यमंत्र्यांचे खासगी सचिव डॉ. धनंजय सावळकर, महसूल विभागाचे उपसचिव सुभाष गावडे, सहसचिव संतोष गावडे, अंकुश शिंगाडे, दे. आ. गावडे, सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव दा. सो. गावडे, वनविभागाचे अवर सचिव सुनील पांढरे, चं. द. तरंगे, जलसंपदा विभागाचे अवर सचिव विनायक लवटे, पाणी पुरवठा विभागाचे अवर सचिव अधिकराव बुधे, सामान्य प्रशासन विभागाचे कक्ष अधिकारी ललित सदाफुले, पदुम विभागाचे कक्ष अधिकारी अशोक नाईकवाडे, गृह विभागाचे कक्ष अधिकारी नारायण माने, उद्योग संचालनालयाचे उद्योग अधिकारी खांडेकर आदींसह मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget