(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); एलिफंटा महोत्सवाचा स्वररंगात समारोप | मराठी १ नंबर बातम्या

एलिफंटा महोत्सवाचा स्वररंगात समारोप

 मुंबई ( २ जून २०१९ ) : जागतिक वारसा स्थळ असलेल्या एलिफंटा येथील महोत्सवाचा आज स्वररंग या सांस्कृतिक कार्यक्रमाने समारोप झाला.

राज्य शासनाचा पर्यटन विभाग आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय एलिफंटा महोत्सवाचा सांगता समारोह एलिफंटा बेटावर झाला. कार्यक्रमाला वित्त विभागाचे प्रधान सचिव नितीन गद्रे, पर्यटन विभागाचे संचालक दिलीप गावडे, घारापुरीचे सरपंच बळीराम ठाकूर, पार्श्वगायक राहुल देशपांडे, स्वप्निल बांदोडकर, गायिका प्रियंका बर्वे, चित्रकार आणि मूर्तिकारही उपस्थित होते.

दुपारी पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी गेट वे ऑफ इंडिया येथे दिव्यांग मुलांसोबत आकाशात बलून सोडले. त्यानंतर दिव्यांग मुलांना एलिफंटा बेटावर रवाना करण्यात आले. रावल यांनी दिव्यांग मुलासोबत हेरिटेज वॉक केला, यावेळी डॉ. सूरज पंडित यांनी या मुलांना मार्गदर्शन केले.

पर्यटन विकासासाठी राज्यात गत चार वर्षात मोठ्या प्रमाणात उपक्रम राबविण्यात येत आहेत, असे सांगून रावल म्हणाले, 70 वर्षांत पहिल्यांदाच घारापुरी बेटावर शासनाने वीज पोहोचवली. त्यामुळे एलिफंटा लेण्या आणि घारापुरी बेटाची वाटचाल अंधाराकडून प्रकाशाकडे झाली आहे.

या महोत्सवाला पर्यटकांनी भरभरुन प्रतिसाद दिल्याने पर्यटन विभागाने पर्यटकांचे आभार मानले.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget