(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); दहावी आणि बारावीच्या पुरवणी परिक्षा 17 जुलैपासून | मराठी १ नंबर बातम्या

दहावी आणि बारावीच्या पुरवणी परिक्षा 17 जुलैपासून

मुंबई ( १२ जून २०१९ ) : माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (दहावी) आणि उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) पुरवणी परीक्षा येत्या 17 जुलैपासून घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या 9 विभागीय मंडळामार्फत पुरवणी परिक्षा घेण्यात येईल.

माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (दहावी) पुरवणी लेखी परिक्षा 17जुलैपासून 30 जुलैपर्यंत घेण्यात येईल. तर उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) पुरवणी लेखी परीक्षा 17 जुलैपासून 3 ऑगस्टपर्यंत घेण्यात येईल. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) व्यवसाय अभ्यासक्रम पुरवणी लेखी परीक्षा 17 जुलैपासून 31 जुलैपर्यंत घेण्यात येईल.

इयत्ता दहावी आणि बारावीच्या प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा 9 जुलै ते 16 जुलै दरम्यान घेण्यात येणार आहे. परीक्षेचे वेळापत्रक मंडळाच्या www.mahahsscboard.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

मंडळाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रकांची सुविधा ही फक्त माहितीसाठी असून परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा/ उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालय यांच्याकडे विभागीय मंडळामार्फत छापील स्वरुपात दिलेले वेळापत्रक अंतिम असेल.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget