(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); नांदेड शहराचे अन् माझे जुने ऋणानुबंध - राज्यपाल चे. विद्यासागर राव | मराठी १ नंबर बातम्या

नांदेड शहराचे अन् माझे जुने ऋणानुबंध - राज्यपाल चे. विद्यासागर राव

नांदेड ( ३ जून २०१९ ) : माझे महाविद्यालयीन शिक्षण नांदेडमध्ये झाले असून या शहराचे अन्‍ माझे जुने ऋणानुबंध आहेत, या शहराने मला खूप काही दिले आहे, या शहराचा मी कायम ऋणी आहे, असे भावनिक उद्गगार महामहीम राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी आज येथे काढले.

अभिनव भारत शिक्षण संस्थेच्या नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयाच्या नूतन प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर नवनिर्वाचित खासदार प्रताप पाटील-चिखलीकर, संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब पांडे, संचालक के.एम. जोशी, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, संचालक कैलास काला हे उपस्थित होते.

महामहीम राज्यपाल चे. विद्यासागर राव पुढे म्हणाले, अभिनव भारत शिक्षण संस्था एक संस्कारमय, शिस्तप्रिय शिक्षण संस्था असून या शिक्षण संस्थेतून शिक्षण घेतलेल्या अनेकांचे आयुष्य घडले आहे. अशा संस्थेचा इतर शिक्षण संस्था आदर्श घेऊन शिक्षणाचा दर्जा उंचाविण्याचा प्रयत्न करीत आहेत, ही बाब अभिनंदनीय आहे.

शिक्षण संस्थांनी विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व क्षमता विकसित करण्यासाठी प्रयत्नशील राहायला हवे. सामाजिक व राष्ट्रीय प्रश्नांवर मात करण्यासाठी, त्यावरील उपाययोजना शोधण्यासाठी या विद्यार्थ्यांना अशा प्रकारचे शिक्षण द्यायलाच हवे. वृक्षारोपण, स्वच्छ भारत अभियान या अभियानांमध्ये विद्यार्थ्यांचा प्रत्यक्ष कृतीशील सहभाग वाढायला हवा, असे सांगून राज्यपाल राव यांनी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना आवाहन केले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौशल्य विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून लाखो-करोडो युवकांना आत्मनिर्भर बनण्याचा मार्ग दाखविला आहे. याच माध्यमातून या संस्थेनेही त्यांच्या संस्थेत कौशल्य विकास कार्यक्रम राबविण्यासाठी पुढे यावे, कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत या संस्थेने त्यांच्याच आवारात विविध प्रशिक्षण पाठ्यक्रम सुरू करावेत जेणेकरून येथील विद्यार्थ्यांनाही त्यांच्या पुढील भविष्यासाठी उद्योग क्षेत्राकडे वळता येईल, आत्मनिर्भर होता येईल.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस महामहीम राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार घालण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब पांडे यांनी संस्थेच्या वाटचालीविषयी तसेच उपक्रमांविषयी माहिती दिली. आभार प्रा. शिवणीकर यांनी मानले.

यावेळी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, विशेष पोलिस महानिरीक्षक रविंद्र सिंघल, जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव, संस्थेचे पदाधिकारी, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget