(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); शितपेय आणि पाणी वितरणाच्या बॉटलचे पुनर्निमाण करणारे केंद्र न उभारल्यास कारवाई - पर्यावरण मंत्री रामदास कदम | मराठी १ नंबर बातम्या

शितपेय आणि पाणी वितरणाच्या बॉटलचे पुनर्निमाण करणारे केंद्र न उभारल्यास कारवाई - पर्यावरण मंत्री रामदास कदम

मुंबई ( १५ जून २०१९ ) : शितपेय आणि पिण्याच्या पाण्याच्या बॉटलचे उत्पादन आणि वितरण करणा-या कंपन्या रिकाम्या बॉटलचे बाजारातून एकत्रिकरण करून पुनर्निमाण करीत आहेत. याचे प्रमाण ३० ते ४० टक्के असून, हे प्रमाण १०० टक्के करण्यासाठी संबंधित कंपन्यांनी तातडीने उपाययोजना आखाव्यात, अन्यथा संबंधित कंपन्यांवर कारवाई करण्याचे निर्देश पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी आज दिले.

आज रिकाम्या प्लास्टीक बॉटलचे एकत्रिकरण करून त्याचे पुनर्निमाण करण्यासंदर्भात बैठकीचे मंत्रालयात आयोजन करण्यात आले होते. यावेळी कदम बोलत होते. या बैठकीस महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव ई. रविंद्रन, बिस्लेरी, पेप्सीको, कोकाकोला अशा एकूण ३० कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

कदम म्हणाले, प्लास्टिक बॉटलचे उत्पादन करणा-या कंपन्यांनी त्या बाजारातून एकत्रिकरण करून त्यांचे पुनर्निमाण करणे गरजेचे आहे. ज्या हॉटेलमध्ये कंपन्या आपल्या बॉटलचे वितरण करीत आहेत तिथे एकत्रिकरण करण्याचे केंद्र सक्तीने उभारावे. समुद्र, पर्यटन स्थळ, किल्ले तसेच जिल्हानिहाय आणि तालुकानिहाय एक केंद्र उभारणे सक्तीचे आहे. यापूर्वीही या कामासाठी मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र, १०० टक्के ही केंद्रे उभारण्यात आली नसून, ज्या कंपन्यांनी एक वर्ष मुदत देऊनही उपाययोजना केलेल्या नाहीत अशा कंपन्याना कारवाईच्या तातडीने नोटीस देण्यात याव्यात असेही कदम यांनी यावेळी संबंधितांना सांगितले.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget