(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); दुकानदारांनी आठ दिवसात अन्न साठ्यासंदर्भात दर्शनी भागात फलक लावावेत - कैलास पगारे | मराठी १ नंबर बातम्या

दुकानदारांनी आठ दिवसात अन्न साठ्यासंदर्भात दर्शनी भागात फलक लावावेत - कैलास पगारे

मुंबई ( २८ जून २०१९ ) : दुकानदारांनी दक्षता समितीबाबतचे फलक, तसेच आपल्या दुकानात असलेला अन्नसाठा यासंदर्भातील फलक लावणे अनिवार्य आहे. ज्या दुकानदारांनी याबाबत कार्यवाही केली नाही त्यांनी येत्या आठ दिवसांत दर्शनी भागात फलक लावावेत असे निर्देश जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे अध्यक्ष कैलास पगारे यांनी दिले.

नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस परिषदेतील शासकीय आणि अशासकीय सदस्य उपस्थित होते.

पगारे यावेळी म्हणाले, दुकानदारांबत काही तक्रार असल्यास दक्षता समितीला संपर्क करुन त्यांना याबाबत सांगणे आवश्यक आहे. याशिवाय नियंत्र‍क शिधावाटप आणि नागरी पुरवठा विभागाकडे येत असलेल्या तक्रारींवर विभागामार्फत तोडगा काढणे आवश्यक असल्याने याबाबत संबंधित यंत्रणांनी लक्ष घालणे आवश्यक आहे.

आज झालेल्या बैठकीदरम्यान पगारे यांच्या हस्ते जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या अशासकीय सदस्यांना ओळखपत्रे देण्यात आली. आजच्या बैठकीत पगारे यांनी कार्यालयनिहाय प्राप्त तक्रारींचा आढावा घेतला.

तसेच ई-पॉसद्वारे वितरीत करण्यात आलेल्या धान्याच्या पावत्या अधिकृत शिधावाटप दुकानदारांनी संबंधित शिधापत्रिकाधारकास देणे अनिवार्य असून याबाबत शिधापत्रिकाधारकांना जागरुक करण्याचे आवाहन, कैलास पगारे यांनी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या अशासकीय सदस्यांना केले.

पगारे यावेळी म्हणाले की, वस्तू व सेवा पुरविणाऱ्या आस्थापनेबाबत काही तक्रार असल्यास संबंधित विभागाशी संपर्क करुन त्यांना याबाबत सांगणे आवश्यक आहे. याशिवाय नियंत्रक शिधावाटप आणि नागरी पुरवठा विभागाकडे येत असलेल्या तक्रारींवर संबंधित विभागामार्फत तोडगा काढणे आवश्यक असल्याने याबाबत संबंधित यंत्रणांनी लक्ष घालणे आवश्यक आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget