(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); सैन्य दलात अधिकारी पदाच्या सुवर्णसंधी | मराठी १ नंबर बातम्या

सैन्य दलात अधिकारी पदाच्या सुवर्णसंधी

सीडीएस मुलाखतीच्या तयारीसाठी 18 जूनपासून मोफत निवासी प्रशिक्षण

मुंबई ( १४ जून २०१९ ) : संघ लोकसेवा आयोग (UPSC) यांच्यामार्फत सीडीएस (Combined Defense Services) परीक्षा 8 सप्टेंबर 2019 रोजी घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी कोणत्याही शाखेच्या पदवीधराला अर्ज करता येणार असून या परीक्षेसाठीचा संघ लोक सेवा आयोगाकडे ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख 8 जुलै आहे. या परीक्षेची जाहिरात 12 जून च्या एम्प्लॉयमेंट न्यूज पेपर आणि संघ लोकसेवा आयोगाच्या वेबसाईटवरही उपलब्ध आहे.

सीडीएस परीक्षेची पूर्व तयारी करुन घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आला आहे. या प्रशिक्षण वर्गाचा कालावधी 18 जून ते 31 ऑगस्ट आहे.

अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे 0253-2451031 व 2451032 वर कार्यालयीन वेळेत (स. 10 ते सायं. 5.30) संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा सैनिक अधिकारी मुंबई शहर यांनी केले आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget