(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); पर्यावरणात "नारायण" | मराठी १ नंबर बातम्या

पर्यावरणात "नारायण"

त्याग, सेवा, मानवता भाव या बरोबर "वृक्ष भाव" वाढवा

वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे धर्मगुरूंच्या बैठकीत आवाहन

मुंबई ( ७ जून २०१९ ) : सर्व धर्मात वृक्ष पूजनीय असून पर्यावरणात "नारायण" आहे ही शिकवण प्रत्येक धर्मातून मिळते असे सांगून त्याग, सेवा, मानवता भाव या बरोबर धार्मिक संस्थांच्या प्रतिनिधींनी समाजात "वृक्ष भाव" रुजवावा असे आवाहन वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

आज सह्याद्री अतिथीगृहात 33 कोटी वृक्ष लागवडीच्या निमित्ताने वन मंत्री समाजातील सर्व घटकांची बैठक घेऊन त्यांना वृक्ष लागवडीच्या मिशन मध्ये सहभागी होण्याचे आवाहन करत आहेत. सुरुवातीला त्यांनी विविध धार्मिक संस्थांच्या प्रतिनिधींची बैठक घेतली त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस बुराणी फाउंडेशन, ईशा फाउंडेशन, बाबुलनाथ मंदिर, महालक्ष्मी मंदिर, अनिरूद्ध अकादमी, पतंजली, ब्राह्मकुमारी आश्रम, आर्ट ऑफ लिविंग आदी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

आपण आपापल्या क्षेत्रातील प्रभावशाली व्यक्तिमत्त्व आहात, आपल्या शब्दाला मान सन्मान आहे त्याचा उपयोग वृक्ष लावण्याची भावना समाजातील लोकांच्या मनात निर्माण करण्यासाठी करावा, असे सांगून मुनगंटीवार म्हणाले, अनेकांकडे वृक्ष लागवडीसाठी जागा नसते परंतु पर्यावरणाचे सेनापती बनून ते वृक्ष लागवडीचा संदेश देऊ शकतात, समाज माध्यमांचा उपयोग करून वृक्ष लागवडीस प्रोत्साहित करू शकतात . सूरज ना बन पाये तो बन के दीपक जलता चल, ही भावना मनात ठेवून वृक्ष लागवडीचा दीप प्रज्वलित करू शकतात. 1926 या वन विभागाच्या हेल्पलाईन वर फोन करून वन, वन्य जीव संरक्षण आणि संवर्धनात सहभागी होवू शकतात. मिले सूर मेरा तुम्हारा या उक्ती प्रमाणे आपल्या लाखो अनुयायांशी संवाद साधून, चर्चा करून वृक्ष लागवडी चे मिशन विस्तारित करू शकतात. "देव बोलतो बाळ मुखातून, देव डोलतो उंच पिकातून" असे आपण म्हणतो. वृक्षात देव आहे अस आपण मानतो, मग या देवकार्यात सहभागी होणे आपलं कर्तव्य आहे असं प्रत्येकाला वाटलं पाहिजे असेही ते म्हणाले. महादेवाला नीलकंठ असे देखील म्हटले जाते कारण त्यांनी विष प्राशन केले, वृक्ष ही तेच काम करतात वातावरणातील कार्बनडायऑक्साईड शोषून घेऊन ते आपल्या जगण्यासाठी प्राणवायू देतात. म्हणजे काय तर वृक्षांमध्ये देवत्व आहे असे उदाहरण ही त्यानी दिले. वृक्ष लागवड कार्यक्रमात पारदर्शकता महत्वाची असल्याचे सांगून मुनगंटीवार यांनी या कामात माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग करून लावलेल्या प्रत्येक रोपांचा लेखाजोखा ठेवला जात असल्याचे सांगितले.

प्रत्येक जिल्हयात समन्वयक

प्रत्येक जिल्ह्यात, विभागात वृक्ष लागवडीच्या कामासाठी समन्वय अधिकारी नियुक्त करण्यात आले असून स्वयंसेवी संस्था, धार्मिक संस्थांच्या प्रतिनिधी ना ते या कामात मदत करतील अशी माहिती वन मंत्र्यांनी दिली. शेतकऱ्यांना आपण फलोत्पादन क्षेत्राकडे नेत असल्याचे सांगून ॲग्रो आणि ऑरगॅनिक फार्मिंग ला शासन प्रेरणा देत आहे. बांबू, रेशीम आणि फलोत्पादन कामातून लोकांना वनापासून धनापर्यंत नेत असल्याचे त्यांनी सांगितले. वृक्षारोपण कामात आपण स्थानिक 156 प्रजातीची रोपे लावत असल्याची माहिती ही त्यांनी दिली. जिथे 30 टक्क्यांपेक्षा जास्त वन क्षेत्र आहे तिथे टँकर ची गरज पडत नसल्याचे ते म्हणाले. आर्ट ऑफ लिविंग सारख्या संस्थांनी 100 गावे दत्तक घेऊन ती हरित करावीत, अशी अपेक्षा ही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

ज्यांच्याकडे वृक्ष लावण्यासाठी जागा नाही त्यांनी प्रसाद रूपाने मंदिरात येणाऱ्या भक्तांना रोपे वाटावीत असे वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले. बैठकीत वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी 33 कोटी वृक्ष लागवडीच्या अनुषंगाने सादरीकरण करून मिशनची माहिती दिली.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget