मुंबई ( १३ जून २०१९ ) : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी अमित गणपत गोरखे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महामंडळाचा अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर गोरखे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या पुढील कार्यासाठी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.
यावेळी गोरखे म्हणाले, अनुसूचित जाती-जमातीतील मातंग समाज व तत्सम १२ पोटजातीतील लोकांचा आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक विकास करण्यासाठी मला नियुक्त केल्याबद्दल मी शासनाचे आभार व्यक्त करीत आहे. साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या योजना गतीमान पद्धतीने राबविण्यासाठी कसोशीने आणि निष्ठेने प्रयत्न करणार असल्याचा विश्वासही गोरखे यांनी यावेळी व्यक्त केला.

टिप्पणी पोस्ट करा