(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); विधानसभा प्रश्नोत्तरे : अदानी इलेक्ट्रीसिटी मुंबई विजदरवाढ प्रकरणी आयोगाने नेमलेल्या समितीचा अहवाल सर्वांसाठी खुला ठेवणार - ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे | मराठी १ नंबर बातम्या

विधानसभा प्रश्नोत्तरे : अदानी इलेक्ट्रीसिटी मुंबई विजदरवाढ प्रकरणी आयोगाने नेमलेल्या समितीचा अहवाल सर्वांसाठी खुला ठेवणार - ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई ( १९ जून २०१९ ) : अदानी इलेक्ट्रीसिटी मुंबई विजदरवाढ प्रकरणी आयोगाने नेमलेल्या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यांनतर सर्वांसाठी खुला ठेवणार असल्याची माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. यावेळी आमदार सर्वश्री सुनिल प्रभू, अतुल भातखळकर, सुनिल राऊत यांनी यासंदर्भातील प्रश्न विचारला होता. यावेळी उत्तर देताना बावनकुळे यांनी उपरोक्त माहिती दिली.

वीज दरवाढीसंदर्भात महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने द्विसदस्यीय समितीची नेमणूक 10 डिसेंबर 2018 च्या अधिसूचनेद्वारे केली असून त्याचा अहवाल 30 जून पर्यंत अपेक्षित आहे.सदरील अहवाल प्राप्त झाल्यानंतर सर्वांसाठी खुला ठेवण्यात येईल. लोकप्रतिनिधींना देखील त्यात आपले म्हणणे मांडता येईल, असेही त्यांनी सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत आमदार सर्वश्री नसीम खान यांनी सहभाग घेतला.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget