(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); मंगळवेढा : पाच गावांचे उपसा सिंचन योजनेसाठी सर्वेक्षण करणार - गिरीश महाजन | मराठी १ नंबर बातम्या

मंगळवेढा : पाच गावांचे उपसा सिंचन योजनेसाठी सर्वेक्षण करणार - गिरीश महाजन

मुंबई ( २७ जून २०१९ ) : सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथील सात गावांपैकी सलगरे बुद्रुक आणि सलगरे खुर्द ही दोन गावे म्हैसाळ उपसा सिंचन योजनेत समाविष्ठ करण्यात आली आहेत. उर्वरित पाच गावांचा समावेश करण्यासंदर्भात पुढील तीन महिन्यात सर्वेक्षण करणार असल्याची माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.

आज विधानसभेत मंगळवेढा तालुक्यातील म्हैसाळ उपसा सिंचन योजनेसंदर्भात सदस्य भारत भालके यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना महाजन बोलत होते.

महाजन म्हणाले, मंगळवेढा येथील लवंगी, आसबेवडी, शिवनगी, सोड्डी आणि यळगी या पाच गावांचे अडीज हजारांचे क्षेत्रफळ असल्याने पुढील तीन महिन्यात त्याचे सर्वेक्षण करून म्हैसाळ उपसा सिंचन योजनेत समाविष्ट करण्याबाबत कारवाई करण्यात येईल. तसेच कालवा सल्लागार समितीच्या सल्ल्यानुसार जेथे जेथे दुष्काळजन्य परिस्थिती होती आणि पाण्याची गरज होती तेथे नियोजनात नसतानाही पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती महाजन यांनी दिली.

यावेळी सदस्य सर्वश्री जयकुमार गोरे, भिमराव धोंडे, गणपतराव देशमुख आदींनी सहभाग घेतला होता.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget