(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); पुरेसे पाणी व चारा उपलब्ध होईपर्यंत छावणी व टँकर सुरु ठेवण्याच्या सूचना - चंद्रकांत पाटील | मराठी १ नंबर बातम्या

पुरेसे पाणी व चारा उपलब्ध होईपर्यंत छावणी व टँकर सुरु ठेवण्याच्या सूचना - चंद्रकांत पाटील

मुंबई ( ३ जून २०१९ ) : राज्यात जूनच्या मध्यापर्यंत पावसाला सुरूवात होणार असली तरी पुरेसे पाणी तसेच जनावरांसाठी चारा उपलब्ध होईपर्यंत चारा छावणी व टँकर सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री तथा दुष्काळ निवारण उपाय योजनासंदर्भातील मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली. तसेच राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयाप्रमाणे शेळ्या मेंढ्यांसाठीची राज्यातील पहिली चारा छावणी सांगोला तालुक्यात सुरू झाल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

दुष्काळ निवारणासंदर्भातील उपाय योजना सुचविण्यासाठी नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक आज मंत्रालयात पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सहकार मंत्री सुभाष पाटील, पर्यटन व रोहयो मंत्री
जयकुमार रावल, कृषी सचिव एकनाथ डवले, मदत व पुनर्वसन मंत्री किशोरराजे निंबाळकर यावेळी उपस्थित होते. यावेळी आतापर्यंत केलेल्या उपाय योजनांचा आढावा पाटील यांनी घेतला.

पाटील म्हणाले, सध्या राज्यात 1583 छावण्या सुरू असून त्यामध्ये लहान व मोठी अशी एकूण 10 लाख 68 हजार 375 जनावरे आहेत. चारा छावण्यांसाठी औरंगाबाद विभागाला 135.18 कोटी, पुणे विभागासाठी 5.07 कोटी, नाशिक विभागासाठी 47 कोटी, पशुसंवर्धन विभागाला 13.81 कोटी रुपये वितरीत करण्यात आले आहेत. तसेच चारा छावणीसाठी अगाऊ रक्कम देण्याच्या सूचनाही संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या आहेत.

आतापर्यंत राज्यातील 4920 गावे व 10 हजार 506 वाड्यांमध्ये 6209 टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. राज्यात 17 जूनपर्यंत पावसाला सुरूवात होईल. त्यानंतर जलयुक्त शिवारमुळे केलेल्या कामाच्या ठिकाणी पाणी साठण्यास सुरूवात होईल. राज्यातील दुष्काळी निधीचे वाटपही सुरू असून आतापर्यंत 67 लाख 47 हजार 835 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 4419 कोटी रुपये वाटप करण्यात आले आहे. रोजगार हमी योजनेची 38 हजार 811 कामे सुरू असून त्यावर 3 लाख 77 हजार 328 मजूर उपस्थित आहेत.

जळगावमधील केळी पिकाच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश जळगावमध्ये काल झालेल्या पावसामुळे केळी पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी
दिले आहेत. राज्य शासन केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे पाटील यांनी सांगितले.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget