विधानपरिषद लक्षवेधी :
मुंबई ( २६ जून २०१९ ) : वेसावा मच्छिमार विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लिमिटेड या संस्थेचा थकित डिझेलवरील प्रतिपूर्ती परतावा हा विभागाची 143 कोटीची पुरवणी मागणी मान्य झाल्यावर लगेचच देण्यात येणार असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी आज विधानपरिषदेत दिली.
वेसावा मच्छिमार विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लिमिटेड या संस्थेचा थकित डिझेलवरील प्रतिपूर्ती परतावाबाबतची लक्षवेधी सूचना ॲङअनिल परब यांनी मांडली होती, त्याला उत्तर देताना जानकर बोलत होते.
जानकर म्हणाले, केंद्र सरकारकडे मत्स्यव्यवसायाला कृषीचा दर्जा देण्याबाबतचा पाठपुरावा सुरु असून हा दर्जा मिळाल्यानंतर मत्स्यव्यवसायाला कृषी योजनेचे सर्व लाभ मिळतील. डिझेल तेलावरील विक्रीकराची प्रतिपूर्तीची सर्व सागरी जिल्ह्यांना वितरीत केलेली संपुर्ण रक्कम संबंधित नौका मालकांच्या बँक खात्यात (DBT द्वारे) जमा करण्याबाबत सातही सागरी जिल्ह्यातील सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय तसेच प्रादेशिक उपआयुक्त मत्स्यव्यवसाय, मुंबई यांना कळविण्यात आलेले असून, त्याप्रमाणे सर्व जिल्हा कार्यालयांना निधी वितरीत करण्यात येत आहे. या चर्चेत सदस्य सर्वश्री जयंत पाटील यांनी सहभाग घेतला.
टिप्पणी पोस्ट करा