(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); तोडगांव औद्योगिक वसाहत उभारण्यासाठी कार्यवाही करा - अतुल सावे | मराठी १ नंबर बातम्या

तोडगांव औद्योगिक वसाहत उभारण्यासाठी कार्यवाही करा - अतुल सावे

मुंबई, दि. 27 : अमरावती जिल्ह्यातील चांदुरबाजार तालुक्यातील तोडगांव एम. आय. डी. सी. साठी प्रस्तावित जागेची पाहणी करण्यात यावी तसेच या औद्योगिक वसाहतीच्या उभारणीत येणा-या अडचनी दूर करण्यात याव्या, अशा सूचना उद्योग राज्यमंत्री अतुल सावे यांनी आज येथे दिल्या.

तोडगांव एम. आय. डी. सी. च्या प्रलंबित समस्यांबाबत सावे यांनी आज विधान भवन येथे झालेल्या बैठकीत आढावा घेतला.

अचलपूर एम. आय. डी. सी. येथे विकसित करण्यात आलेल्या आराखड्यातील अधिग्रहित केलेल्या काळ्या कसदार जमिनीच्याऐवजी औद्योगिक क्षेत्राच्या पश्चिमेकडील महामंडळाच्या हद्दीलगतची जमीन संपादित करण्याबाबतही या बैठकीत चर्चा करण्यात आली.

यावेळी आमदार बच्चू कडू, महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तेजुसिंग पवार आणि उद्योग विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget