मुंबई ( ६ जून २०१९ ) : महात्मा गांधी जी यांच्या 150 व्या जयंती निमित्ताने राबवाव्याच्या विविध धोरणे आणि कार्यक्रमाच्या अंमलबजावणी साठी 150 कोटी रु चा निधी विधिमंडळाच्या येत्या अधिवेशनात उपलब्ध करून दिला जाईल अशी माहिती अर्थ मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
आज सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत ते बोलत होते. यावेळी नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव देबाशीष चक्रवर्ती यांच्यासह समितीचे इतर पदाधिकारी आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 150 वी जयंती राज्यशासनाने साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. यानिमित्ताने महात्मा गांधी यांचे कार्य आणि विचारधारेवर आधारित विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. ग्राम विकास विभाग यासाठी नोडल विभाग म्हणून काम करत असून या कार्यक्रमाचा आराखडा निश्चित करण्यासाठी अर्थ मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. आज झालेल्या बैठकीत श्री. मुनगंटीवार म्हणाले, ग्राम विकास हा महात्मा गांधीजी यांच्या कार्याचा मूलाधार होता. ही बाब लक्षात घेऊन उद्योग विभागाने लघु, कुटीर आणि ग्रामोद्योग विकासाचे स्वतंत्र धोरण एक महिनाभरात मान्यतेसाठी सादर करता येईल का, याचा अभ्यास करावा. ही जयंती अधिक नावीन्यपूर्ण उपक्रमाच्या अंमलबजावणीतून साजरी करताना राबवाव्याच्या कार्यक्रमाबाबत सर्व विभागीय आयुक्त, महानगरपालिका आयुक्त जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व प्रशासकीय विभागांचे प्रमुख याना पत्र पाठवून सूचना, प्रस्ताव मागविण्यात यावेत. महात्मा गांधीजी नी महाराष्ट्रात स्थापन केलेल्या संस्थांची माहिती घेऊन अशा संस्थांना ही या कर्यक्रमात सहभागी करून घ्यावे. त्या संस्थांच्या कामाना काही मदत करता येईल का ते पहावे. येत्या जुलै महिन्यात जयंती साजरी करण्याच्या दृष्टीने गाव पातळीवर कार्यक्रमाचे परिपूर्ण नियोजन करण्यासाठी स्वतंत्र ग्रामसभेचे आयोजन करण्या संबंधीचा जी आर ग्राम विकास विभागाने काढावा. मुख्य सचिवांशी चर्चा करून येत्या 11 तारखेला सर्व सचिवांची एक बैठक यासंदर्भात आयोजित केली जावी. आज विविध विभागांनी ते या निमित्ताने करत असलेल्या कामाची माहिती दिली. यामध्ये आरोग्य विभाग व्यसनमुक्ती, लिपरसी ऍक्टिव्ह केस डिटेक्शन ड्राईव्ह हाती घेणार आहे. जे जे स्कुल ऑफ आर्टस् ने महात्मा गांधी आणि जागतिक शांतता ता विषयावर 200 पेंटिंग्ज तयार केल्या आहेत त्याच्या प्रदर्शनाचे ते आयोजन करणार आहेत. खादी ग्रामोद्योग ने ही अनेक उपक्रमाचे आयोजन केले आहे. महाराष्ट्रातील ग्रामविकासाला गती मिळेल अशा अनेक उपक्रमांचा या जयंती निमित्ताने होणाऱ्या कर्यक्रमात समावेश करण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा