(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन | मराठी १ नंबर बातम्या

महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई ( ७ जून २०१९ ) : वीरशैव लिंगायत समाजासाठी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ति व संस्थांना राज्य शासनाच्या वतीने महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कार देण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी 15 जुलै 2019 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्ग विभागाने केले आहे.

वीरशैव-लिंगायत समाजासाठी सामाजिक, कलात्मक, समाज संघटनात्मक, आध्यात्मिक प्रबोधन व साहित्यिक क्षेत्रात काम करीत असलेल्या व्यक्तीच्या व संस्थांच्या कामाची दाद/दखल घ्यावी व इतरांना त्या पासून प्रेरणा मिळावी यासाठी तसेच या समाजातील समाजसेवक, कलावंत, समाज संघटनात्मक कार्येकर्ते, आध्यात्मिक प्रबोधनकार व साहित्यिक सरसावून पुढे यावेत यासाठी महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कार देण्यात येणार आहे. व्यक्तीसाठी एक व सामाजिक संस्थांसाठी एक असे एकूण दोन पुरस्कार देण्यात येणार आहेत. या पुरस्कारासाठी राज्यभरातून इच्छुक व्यक्ती व संस्था यांनी संबंधित जिल्ह्याच्या ठिकाणी सहायक आयुक्त, समाजकल्याण यांच्याकडे सीलबंद लिफाफ्यात रितसर अर्ज करावेत.

दि. 8 मार्च 2019 रोजीच्या शासन निर्णयाद्वारे या पुरस्कारासाठी पात्रतेची नियमावली तयार करण्यात आली असून महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईट संबंधित शासन निर्णय असून त्याचा संकेतांक क्रमांक 201903082039003522 असा आहे. तरी इच्छुक संस्था व व्यक्ती यांनी या पुरस्कारासाठी संबंधित जिल्ह्याच्या सहायक आयुक्त समाज कल्याण यांच्याकडे 15 जुलै पर्यंत रितसर अर्ज करावे. अर्जासोबत आवश्यक व योग्य ती माहिती जोडावी, असे आवाहन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget