विधानसभा लक्षवेधी
मुंबई ( २६ जून २०१९ ) : जळगाव येथे राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान तसेच अन्य वैद्यकीय देयकांच्या प्रतिपपूर्तीबाबात तसेच साहित्य खरेदीसंदर्भात झालेल्या गैरप्रकाराबाबत मंत्रालय स्तरावरून या प्रकरणाची चौकशी करण्यात येवून संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
विधानसभेत जळगाव जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याविरोधात साहित्य खरेदीबाबत गैरप्रकार झाला असल्यासंदर्भातील लक्षवेधी सदस्य एकनाथ खडसे यांनी मांडली होती. त्यास उत्तर देताना शिंदे म्हणाले.
शिंदे म्हणाले, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये राष्ट्रीय ग्रामीण आरेाग्य अभियान तसेच अन्य वैद्यकीय देयकांच्या प्रतिपूर्तीसाठी लोकांची अडवणूक करण्यात येत असल्याची तसेच कार्यालयात साहित्य खरेदी, औषध खरेदी व अन्य खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणात होत असलेल्या गैरप्रकाराबाबत तातडीने जिल्हा परिषद अध्यक्षांनी दखल घेऊन जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या चौकशीचे निर्देश दिले. संबंधित अधिकाऱ्यांची मंत्रालय स्तरावर चौकशीचे निर्देश देऊन तातडीने बदली करण्यात येईल, असेही शिंदे यांनी यावेळी सांगितले.
टिप्पणी पोस्ट करा