(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); नगरपंचायत नगराध्यक्षपद सोडत | मराठी १ नंबर बातम्या

नगरपंचायत नगराध्यक्षपद सोडत

हातकणंगले- अनुसूचित जाती (सर्वसाधारण), चंदगड - खुला (महिला); ढाणकी- नागरिकांचा मागास प्रवर्ग (खुला)

मुंबई ( ४ जून २०१९ ) : नवनिर्मित चंदगड, हातकणंगले (जि. कोल्हापूर) आणि ढाणकी (ता. उमरखेड, जि.यवतमाळ) नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदाची सोडत आज नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या हस्ते काढण्यात आली.

हातकणंगले नगरपंचायतीचे नगराध्यक्षपद अनुसूचित जाती (सर्वसाधारण), चंदगड - खुला (महिला) तर ढाणकी नगरपंचायतीचे नगराध्यक्षपद नागरिकांचा मागास प्रवर्ग (खुला) साठी आरक्षित झाले.

सोडतीप्रसंगी नगरविकास विभागाचे उपसचिव स. ज. मोघे, अवर सचिव सचिन सहस्त्रबुद्धे, कक्ष अधिकारी महेश हंशेट्टी यांच्यासह चंदगड, हातकणंगले आणि उमरखेड तालुक्याचे तहसीलदार तसेच विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

प्रारंभी आरक्षण सोडतीबाबतच्या तरतुदी सांगण्यात आल्या. आरक्षण सोडत नियम 2017 मधील तरतुदीनुसार या सोडत काढण्यात आल्या. राज्यात सध्या 129 नगरपंचायती असून त्यापैकी 126 नगरपंचायतींचे आरक्षण यापूर्वीच काढण्यात आले होते.

विविध प्रवर्गांसाठी आरक्षित नागराध्यपदांची संख्या आणि भरलेली पदे पाहता अनुसूचित जातीची नगराध्यक्षपदाची एक जागा शिल्लक होती. त्यानुसार या तीन नगरपंचायतीतील अनुसूचित जातीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात अनुसूचित जातीची सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या हातकणंगले नगरपंचायतीचे नगराध्यक्षपद अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाले. उर्वरित दोन नगराध्यक्षपदांची सोडत चिठ्ठी टाकून काढण्यात आली.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget