(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); विधान परिषद प्रश्नोत्तरे : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील करदात्यांचे धनादेश न वटल्याप्रकरणी चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | मराठी १ नंबर बातम्या

विधान परिषद प्रश्नोत्तरे : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील करदात्यांचे धनादेश न वटल्याप्रकरणी चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई ( १९ जून २०१९ ) : कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाला सन 2018-2019 या आर्थिक वर्षात मालमत्ता करापोटी करदात्यांनी दिलेले धनादेश विविध कारणांमुळे बॅंकेत न वटता परत आले. यासंदर्भात अधिक चौकशी
करुन कार्यवाही करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत सांगितले.

उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने सदस्य डॉ. मनीषा कायंदे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेत मालमत्ता करापोटी करदात्यांनी दिलेले 20.69 कोटी रुपयांचे एकूण 939 धनादेश विविध कारणांमुळे परत आले असल्याची माहिती नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर यांनी दिली. उपरोक्त धनादेशांपैकी खात्यावर पुरेशी रक्कम जमा नसल्याच्या कारणास्तव तर उर्वरित 555 धनादेश इतर कारणास्तव परत आले आहेत. यापैकी नोटीस देण्यापूर्वीच 462 तर नोटीस दिल्यानंतर 207 धनादेशांमार्फत 8.94 कोटी रुपये रक्कम जमा झाली आहे. इतर करदात्यांनी विहीत मुदतीत रक्कम जमा न केल्याने न्यायालयात दावे दाखल करण्यात आले असल्याचेही सागर यांनी सांगितले.

यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री ॲड. अनिल परब, जयंत पाटील, धनंजय पाटील यांनी सहभाग घेतला.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget