(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); पर्यावरणदिनी राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राजभवन येथे वृक्षारोपण | मराठी १ नंबर बातम्या

पर्यावरणदिनी राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राजभवन येथे वृक्षारोपण

मुंबई ( ५ जून २०१९ ) : पर्यावरण दिनानिमित्त आज राजभवन येथे राज्यपाल चे. विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वृक्षारोपण केले.

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, ईशा फाउंडेशनचे श्री .सद्गुरु जग्गी वासुदेव, राज्यपालांचे प्रधान सचिव वेणूगोपाल रेड्डी, वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांनीही यावेळी वृक्षारोपण केले.

महाराष्ट्र शासनाचा वन विभाग आणि डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्ष लागवड व संवर्धन अभियानांतर्गत वृक्षारोपणकार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी विविध प्रकारच्या ३०० रोपांची राजभवन येथे लागवड करण्यात आली . मान्यवरांनी राजभवन येथील समुद्र किनाऱ्याला भेट देऊन तेथील वृक्ष संपदेची पाहणी केली.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget