(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); मोबाईल टॉवर व शितगृहामुळे लागणाऱ्या आगीवर उपाययोजना करण्यासाठी तज्ज्ञांची समिती नेमणार - योगश सागर | मराठी १ नंबर बातम्या

मोबाईल टॉवर व शितगृहामुळे लागणाऱ्या आगीवर उपाययोजना करण्यासाठी तज्ज्ञांची समिती नेमणार - योगश सागर



मुंबई, दि. 26 : राज्यात मोबाईल टॉवर व शितगृहामुळे महानगरांमध्ये आग लागण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडू लागल्या आहेत. या लागणाऱ्या आगीवर उपाययोजना करण्यासाठी तज्ज्ञांची समिती लवकरच नेमणार असल्याची माहिती नगरविकास राज्यमंत्री योगश सागर यांनी आज विधानपरिषदेत दिली.

नागपूर शहरात आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होणे, अनधिकृत इमारत, अग्निशमन दल व मोबाईल टॉवरबाबत लक्षवेधी सूचना सदस्य गिरीष व्यास यांनी मांडली होती, त्याला उत्तर देताना सागर बोलत होते.

सागर म्हणाले, राज्यात आग प्रतिबंधक व जीव संरक्षक उपाययोजना अधिनियम, डिसेंबर, 2008 मध्ये लागू झाल्यानंतर, महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागामार्फत उपरोक्त विविध आस्थापना तसेच इमारती यांची तपासणी करण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे.

नागपूर शहर/नागपूर महानगरप्रदेश विकास प्राधिकरणाच्या हद्दीमध्ये माहे एप्रिल, 2019 मध्ये 304 आणि मे, 2019 मध्ये 277 किरकोळ आगीच्या घटनांची नोंद झाल्याचे महापालिकेच्या अग्निशमन विभागाने कळविले आहे. यामध्ये जिवीतहानी झाली नाही. आग प्रतिबंधक व जीव संरक्षक उपाययोजना अधिनियम 2006 मधील तरतुदीनुसार रहिवासी, व्यावसायिक तथा विविध उपक्रमाच्या एकुण 3938 इमारतींना नागपूर अग्निशमन व आणिबाणी सेवा विभागामार्फत प्रथम ना-हरकत प्रमाणपत्र निर्गमित करण्यात आले असून, त्यापैकी 913 इमारतधारक/भोगवाटादार यांनी अग्निशमन विभागाचे अंतिम ना-हरकत प्रमाणपत्र घेतलेले आहे. मोबाईल टॉवरच्याबाबतही शासन योग्य ती उपाययोजना करेल.

या चर्चेत सदस्य सर्वश्री हेमंत टकले, नागोराव गाणार आदींनी सहभाग घेतला होता.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget