(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); स्वाइन फ्लूमुळे होणाऱ्या मृत्यूच्या संख्येत घट - आरोग्यमंत्र्यांची माहिती | मराठी १ नंबर बातम्या

स्वाइन फ्लूमुळे होणाऱ्या मृत्यूच्या संख्येत घट - आरोग्यमंत्र्यांची माहिती

मुंबई ( ३ जून २०१९ ) : राज्यामध्ये स्वाइन फ्लूच्या प्रार्दुभावामुळे होणाऱ्या मृत्यूच्या प्रमाणात मे महिन्यापासून घट झाली आहे. गेल्या सुमारे 25 दिवसांमध्ये एकही रुग्णाचा मृत्यू झाला नसून रुग्णसंख्येत देखील घट झाली आहे. राज्यात केवळ दोन रुग्ण व्हेंटीलेटरवर आहेत. आरोग्य विभागामार्फत प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत असल्याचे आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले.

गेल्या वर्षी थंडीचे प्रमाण जास्त असल्याने राज्यात फेब्रुवारी- मार्च महिन्यापर्यंत थंडीचे प्रमाण काही भागात जाणवले. हे हवामान स्वाइन फ्लूच्या विषाणूंसाठी पोषक असल्याने या दोन महिन्यांमध्ये रुग्णसंख्येत आणि रुग्णांच्या मृत्यूच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून येते.

आरोग्यविभागामार्फत जोखमीतील व्यक्तींसाठी मोफत लसीकरण केले जाते. जानेवारी 2019 पासून मे अखेरपर्यंत 9 हजार व्यक्तींना लसीकरण करण्यात आले, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. विभागामार्फत स्वाइन फ्लू सदृश रुग्णांचे नियमित सर्वेक्षण केले आज आहे. आतापर्यंत राज्यभरात सुमारे 11 लाख 75 हजार रुग्णांची तपासणी करण्यात आली. सुमारे 21 हजार संशयीत रुग्णांना ऑसेलटॅमिविर गोळ्या देण्यात आल्या आहेत. सध्या 105 रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. पुणे महापालिकेच्या क्षेत्रात दोन रुग्ण व्हेंटीलेटरवर आहेत. जानेवारी ते मे अखेर स्वाइन फ्लूमुळे 177 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

जानेवारीमध्ये 117 रुग्ण आढळून आले तर या संपूर्ण महिनाभरात 26 रुग्णांचा मृत्यू झाला. फेब्रुवारीमध्ये 401 रुग्ण आढळून आले तर 49 रुग्णांचा मृत्यू झाला. मार्चमध्ये 585 रुग्ण आढळून आले तर 63 रुग्णांचा मृत्यू झाला. एप्रिलमध्ये 328 रुग्ण आढळून आले तर 35 रुग्णांचा मृत्यू झाला. मेमध्ये 188 रुग्ण आढळले त्यापैकी 4 रुग्णांचा मृत्यू झाला. 10 मे नंतर राज्यात स्वाइन फ्लूमुळे एकही मृत्यू झाल्याची नोंद नाही.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget