(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); खाणपट्ट्यात अनधिकृतरित्या उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई - सुभाष देसाई | मराठी १ नंबर बातम्या

खाणपट्ट्यात अनधिकृतरित्या उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई - सुभाष देसाई


विधानसभा प्रश्नोत्तरे

मुंबई ( २६ जून २०१९ ) : उबरशेत (जि.रत्नागिरी) ग्रामपंचायत येथे खाणपट्ट्यात सुरू असलेले उत्खननाची पाहणी करून ते नियमबाह्य असल्याचे आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी आज दिली.

विधानसभेत मौजे उटंबर, उबरशेत ग्रामपंचायत येथील खाणपट्ट्यात अनधिकृत उत्खनन होत असल्यासंदर्भात सदस्य अशोक पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना देसाई बोलत होते.

देसाई म्हणाले, मौजे उटंबर (जि.रत्नागिरी) येथे पर्यावरणाची परवानगी नसल्याने कोणत्याही प्रकारचे उत्खनन सुरू नाही. तसेच, उबरशेत येथे अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीच्या अहवालानुसार तीन ते चार फुटाचे खोदकाम सुरू आहे. मात्र, तेथे जर अनधिकृतरित्या २०० ते ३०० फुटाचे खोदकाम होत असेल तर, संबंधित आशापुरा माईनकेम लि. कंपनीवर कारवाई करण्यात येईल असेही देसाई यांनी सांगितले. सदर खाणपट्टयात आंबा व काजू झाडांच्या बागा नसून तूरळक प्रमाणात झाडे आहेत. त्यावर धूळ उडू नये म्हणून कंपनीकडून खबरदारी घेण्यात येत असल्याची माहितीही देसाई यांनी दिली.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget