(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); कृषी टर्मिनल मार्केट उभारण्याबाबत तातडीने कार्यवाही करू - राम शिंदे | मराठी १ नंबर बातम्या

कृषी टर्मिनल मार्केट उभारण्याबाबत तातडीने कार्यवाही करू - राम शिंदे

मुंबई ( २७ जून २०१९ ) : नाशिक कृषी टर्मिनल मार्केट उभारण्याबाबत मान्यता दिली असून, ७३.८० एकर जागेस मंजूरी मिळाली आहे. उर्वरित जागेसाठी प्रयत्न सुरू असून पुढील आठ दिवसात यासंदर्भात प्रस्ताव पाठवून कामास गती देण्यात येणार असल्याची माहिती पणन मंत्री राम शिंदे यांनी आज विधानसभेत दिली.

मौजे पिंप्रि सैय्यद येथे कृषी टर्मिनल मार्केट उभारण्यासंदर्भात सदस्य छगन भुजबळ यांनी लक्षवेधी मांडली होती. त्यास उत्तर देताना शिंदे बोलत होते.

शिंदे म्हणाले, उत्तर महाराष्ट्राच्या विकासास चालना देण्याच्या हेतुने शासनाने नाशिक येथे विकास कार्यक्रमांतर्गत कृषी टर्मिनल मार्केट उभारण्यात येणार आहे. हस्तांतरणासाठी उपलब्ध असलेल्या जागेपैकी टर्मिनल मार्केट उभारण्यासाठी उपयुक्त अशी ७३.८० एकर जमीन पणन मंडळाच्या नावे झाल्यानंतर सदर जागेवर ॲग्रो मार्केट झोन/हब बनविण्याकरिता तसेच खाजगी भागीदारीतून प्रकल्प उभारणे प्रस्तावित असल्याने त्यानुसार बिझनेस मॉडेल व प्रकल्प अहवाल तयार करण्याची कार्यवाही कृषी पणन मंडळामार्फत करण्यात येईल व कामाला गती देण्यात येईल, अशी माहिती शिंदे यांनी दिली.

यावेळी सदस्य बाळासाहेब थोरात यांनी चर्चेत सहभाग घेतला.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget